Youtube

Youtube
Chanel

Sunday, 20 June 2021

navoday&shishyavrutti 22

*# खुशखबर # खुशखबर # खुशखबर*

🎯2021-22 या वर्षात शिष्यवृत्ती व नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग

*🔴संकल्प नवोदय २०२२*
*🔴संकल्प शिष्यवृत्ती २०२२*

*अगदी मोफत मार्गदर्शन ऑनलाईन क्लास नवीन बॅच सुरू*

मागील वर्षीच्या *संकल्प शिष्यवृत्ती ऑनलाइन शाळा*  या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर यावर्षी शिष्यवृत्ती व नवोदयची  परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ZOOM व Youtube Live चा वापर करून आम्ही सुरू करत आहोत  *संकल्प नवोदय २०२२* व *संकल्प शिष्यवृत्ती २०२२* हा मोफत मार्गदर्शन ऑनलाईन क्लास.

या क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी *५ वी व ८वी*  वी वर्गातील विद्यार्थ्यांनी खालील लिंकवरून योग्य ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.


 *महत्त्वाची सूचना*
*फक्त नवोदय व शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीच ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.*

*🔵वर्ग ५ वी -नवोदय व शिष्यवृत्ती ग्रुपची लिंक*
*🔴संकल्प नवोदय २०२२🔴*
👇🏻👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/KMkd6jNa7wk65B4h4Rqusl

*🔵८ वी-शिष्यवृत्ती ग्रुपची लिंक*
*🎯संकल्प शिष्यवृत्ती २०२२🎯*
👇🏻👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/KYb2HFdIU3PJrcZk1XpGEX

*🎯क्लासची वेळ ग्रुपवर कळवण्यात येईल*

तरी विद्यार्थ्यांनी आजच ग्रुपमध्ये सहभागी व्हावे

*सुलभक*
*शिरीषकुमार द. लोणकर*
9561877966 / 8830828104

Thursday, 17 June 2021

Rastramata Jijau smrutidin

*🔥आज राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांचा स्मृती दिन🔥*

        *💫राज्याभिषेकाच्या प्रचंड गडबडीतही महाराजांचे पूर्ण लक्ष आई साहेबांकडे  होते. आई साहेब म्हणजे तर महाराजांचे सर्वस्व. महाराजांचे दैवत...*

      *👉गडावरची हवा फार थंड.वाऱ्याचे वेग फार आई साहेबांची प्रकृति अतिशय नाजूक झालेली.गड त्यांना मानवेना. म्हणून महाराजांनी खास त्यांच्यासाठी, गडाच्या निम्म्या डोंगरात असलेल्या,पाचाड या गावी एक उत्तम वाडा बांधला.तेथे त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केली. राज्याभिषेकासाठी महाराजांनी आपले हे थोर दैवत अलगद गडावर नेले.*

      *👉लटलटत्या मानेने आणि क्षीण झालेल्या डोळ्यांनी त्यांनी आपल्या बाळाचे सारे कोडकौतुक न्याहाळले. राजा म्हणजे विष्णूचा अवतार. शिवबाला विष्णुरूप प्राप्त झालेले त्यांनी पाहिले.आता आणखी काय हवे होते त्यांना? त्यांना काहीही नको होते, पण महाराजांना त्या हव्या होत्या.*

       *👉राज्याभिषेक उरकल्यावर महाराजांनी (बहुधा मेण्यातून ) आईसाहेबांना गडावरून खाली पाचाडच्या वाड्यात आणले.आईसाहेबांनी राजधानीच्या महाद्वाराचा उंबरठा ओलांडला. रायगडाकडे त्यांची पाठ झाली.आई साहेबांना ते महाद्वाराचे बुरुज जणू काही विचारीत होते, 'आईसाहेब, आता पुन्हा येणे कधी व्हायचे ?*

*आता कैचें येणें जाणे ?*
*आता खुंटले बोलणे !*
*हेचि तुमची अमुची भेटी,*
*येथूनिया जन्मतुटी !*

      *पान पिकले होते, वाराहि भिऊन जपून वागत होता.आणि पाचाडच्या वाड्यात आईसाहेबांनी अंथरूण धरले. महाराजांच्या हृदयात केवढी कालवाकालव झाली असेल? अखेरचेच हे अंथरूण ! आईसाहेब निघाल्या ! महाराजांची आई चालली ! सती निघालेल्या आईसाहेबांना पूर्वी महाराजांनी महत्प्रयासाने मागे फिरविले. त्यावर दहावर्षे आईसाहेब थांबल्या. पण आता त्यांना कोण थांबविणार ? … आई ! कसले हें विचित्र नाते परमेश्वराने निर्माण केले आहे ! जिच्या प्रेमाला किनारे नाहीत.*

       *😔जीच्या प्रेमाचा ठाव लागत नाही.जगाला आई देणारा परमेश्वर किती किती चांगला असला पाहिजे ! पण तीच आई हिरावून घेऊन जाणारा तो परमेश्वर केवढा निर्दय असला पाहिजे !ज्येष्ठ वद्य नवमीचा दिवस उजाडला.बुधवार होता या दिवशी. आई साहेबांची प्रकृती अत्यंत बिघडली.आयुष्याचा हिशेब संपत आला. वर्षे, महिने, आठवडे, दिवस संपले. आता अवघ्या काही तासांची थकबाकी राहिली.*

      *😔दिवस मावळला. रात्र झाली. मायेच्या माणसांचा गराडा भवती असतांना, सूर्यपराक्रमी पुत्र जवळ असतांनाही मृत्यूचे पाश पडू लागले. सर्व हतबल झाले होते. कोणाचेही काही चालत नाही इथे.घोर रात्र दाटली. मध्यरात्र झाली. आईसाहेबांनी डोळे मिटले ! श्वासोच्छ्वास संपला ! चैतन्य निघून गेले ! आईसाहेब गेल्या ! छत्रपतींचे छत्र मिटले गेले ! मराठ्यांचा राजा पोरका झाला ! स्वराज्यावरचा आपला पहारा संपवून आईसाहेब निघून गेल्या.*

       *😔महाराज दु:खात बुडाले. आई वेड्या शिवबाची आई गेली. शिवनेरीवर अंगाई गाणारी, लाल महालात लाड करणारी, राजगडावर स्फूर्ती देणारी आणि रायगडावर आशीर्वाद देणारी आई कायमची निघून गेली. आता या क्षणापासून आईची हाक ऐकू येणार नाही ! कोणत्या शब्दात सांगू आईच्या हाकेचे सुख ? ज्यांना आई आहे ना, त्यांनाच, -- नाही, नाही, -- ज्यांना आई नाही ना, त्यांनाच फक्त ते समजू शकेल ! ज्येष्ठ वद्य नवमी, बुधवारी, मध्यरात्री (दि. 17 जून 1674 ) जिजाऊ माँ साहेब अनंतात विलीन झाल्या ...😔*

   *🔥अशा या थोर मातेला त्यांच्या स्मृती दिनी कोटी-कोटी वंदन👏👏👏*

                   संकलन
https://deepakdambalekwt.blogspot.com/

        

Diksha app

*अभ्यासमाला २.०*
*शाळा बंद, पण शिक्षण आहे!*

*दिवस दुसरा*
*बुधवार, दिनांक १६ जून २०२१*

नमस्कार!
       *नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व पालक यांना मनःपूर्वक शुभेच्छा!*
    शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील या अभ्यासमालेत आपण दररोज इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांना एका विषयाच्या अभ्यासासाठी DIKSHA Application वरील ई-साहित्य लिंक देणार असून आपल्या शिक्षक/ पालकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे ई-साहित्य पाहून त्यावर स्वयंअध्ययन करावे. अधिक अभ्यासासाठी DIKSHA Application वरील संदर्भ साहित्य,स्वाध्याय यांचाही वापर करावा.
या अभ्यासमालेतील लिंक्स पाहण्यासाठी खालील लिंक वापरून मोबाईलमध्ये DIKSHA App डाऊनलोड करा.
http://bit.ly/3znMBI2

चला तर मग! सुरुवात करूया अभ्यासाला!


*उजळणी*.                                                                                                 
*आजचा विषय- गणित*

*इयत्ता पहिली*
सोप्या पद्धतीने बनवा मासा 
http://bit.ly/3xn0KmK

 *इयत्ता दुसरी*
१) 1 ते 20 संख्या ओळख
http://bit.ly/2RXAtwz

२) 21 ते 40 संख्या ओळख
http://bit.ly/3pVl38n

*इयत्ता तिसरी*
१) विविध भौमितिक आकार
http://bit.ly/3pOsY7H

२) विविध भौमितिक आकृत्या (ओळख)
http://bit.ly/3gjyYSA

*इयत्ता चौथी*
संख्याज्ञान 
http://bit.ly/3q2qym5

*इयत्ता पाचवी*
१) भौमितिक आकार प्रस्तावना 
http://bit.ly/3wnmv65

२) तीन अंकी संख्या उजळणी 
http://bit.ly/3wzmA6w

*इयत्ता सहावी*
१) रोमन अंक 
http://bit.ly/3wzMc3z

२) संख्याज्ञान 
http://bit.ly/2TtCXmu

*इयत्ता सातवी*
१) भूमितीतील मूलभूत संबोध
http://bit.ly/3gkDikA

२) दशांश अपूर्णांक
http://bit.ly/3glm2vD

*इयत्ता आठवी*
१) भौमितिक रचना
http://bit.ly/3vsrelO

२) पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार
http://bit.ly/35hNowj

*इयत्ता नववी*
समांतर रेषा व छेदिका
http://bit.ly/3gn2xD2

*इयत्ता दहावी*
बहुपदी आणि बहुपदीची कोटी
http://bit.ly/3vm8unQ

*विशेष गरजाधिष्ठीत विद्यार्थ्यांसाठी*
१) रंग 
http://bit.ly/3xjWR2e

२) परावर्तनाचे प्रकार
http://bit.ly/3zp0sxA

इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. - सह्याद्री वाहिनीवर सुरू असणाऱ्या Live तासिका पाहण्यासाठीची लिंक
https://youtube.com/c/DoordarshanSahyadri

*(घरी राहा, सुरक्षित राहा!)*

*दिनकर टेमकर*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

Wednesday, 16 June 2021

shivarayancha itihas class 4

parisar 2 Shivarayancha itihas class 4

parisar abhyas class 4

parisar abyas class 4

English class 4

English class 4

mathematics class 4

math class 4

marathi class 4

marathi class 4

mathematics class 3

mathematics class 3

parisar abyas class 3

parisar abyas class 3

English class 3

English class 3

marathi class 3

marathi class 3

parisar abhyas class 2

parisar abhyas class 2

English class 2

English class 2

mathematics class 2

mathematics class 2

marathi class 2

marathi class 2

English class 1

English class 1

parisar abhyas class 1

parisar abhyas class 1

mathematics class 1

mathematics class 1

marathi class 1

marathi class 1

Thursday, 10 June 2021

scert brij course

यंदा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना एक नवीन ब्रिज कोर्स शिकावा लागणार आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी शाळेतील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग हा ब्रिज कोर्स तयार करत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करण्याचे काम सुरू आहे.


शैक्षणिक वर्ष 2020-2021 पासून राज्यातील शाळा बंद आहेत. दीड वर्षापासून विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत. त्यात कोरोनासारखा साथीचा जीवघेणा आजार त्यांनी पाहिला किंवा अनुभवला आहे. अशा सर्व परिस्थितीचा विचार करता यंदा शाळा सुरू झाल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेला हा ब्रिज कोर्स पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे.
या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम ठरवणार असल्याचं SCERT ने स्पष्ट केलं.

हा ब्रिज कोर्स नेमका कसा असेल? ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार आहे का? त्याचे स्वरुप काय असणार आहे? शाळा सुरू करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने तयारी सुरू केलीय का? अशा विविध प्रश्नांचा आढावा आपण या बातमीतून घेणार आहोत.

ब्रिज कोर्स कसा असेल?

15 जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी यादृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

SCERT चे संचालक दिनकर टेमकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी समजा पाचवीत आहे. तेव्हा हा ब्रिज कोर्स चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसंच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही असे महत्त्वाचे विषय आम्ही ब्रिज कोर्समध्ये घेत आहोत."

• प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा असणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयासाठी ब्रिज कोर्स उपलब्ध असेल. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं.

• हा ब्रिज कोर्स 45 दिवसांचा असणार आहे.

• यंदा विद्यार्थी इयत्ता तिसरीत असल्यास ब्रिज कोर्स हा दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.

• पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल.

• ब्रिज कोर्स शिकवल्यानंतरच विद्यार्थ्यांना चालू इयत्तेतील अभ्यासक्रम शिकवता येणार आहे.

• ब्रिज कोर्सकडे केवळ एक कोर्स पूर्ण करण्याच्यादृष्टीने पाहण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रात्यक्षिक, त्यांचे अनुभव याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा असल्याचे एससीईआरटी मराठी विभाग प्रमुख आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

• सुरुवातीला शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा स्तर काय आहे याची चाचपणी करण्याच्या सूचना आहेत. ब्रिज कोर्स शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त झाल्या आहेत की नाही हे सुद्धा शिक्षकांना पहावे लागणार आहे.

• हा ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहेत.

• मराठी, गणित, सामाजिकशास्त्र अशा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ब्रिज कोर्स असणार आहे. SCERT यासंदर्भातील नियोजन करत असून प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळांकडून ब्रिज कोर्स अंतिम केला जाणार असल्याचे समजते.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) मराठी भाषा विभागाच्या प्रमुख आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुलांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स तयार केला जात आहे. शाळा बंद असल्याने दुसरीत गेलेला विद्यार्थी प्रत्यक्षात पहिलीत शाळेत न जाता दुसरीत गेला आहे. तेव्हा प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे असं आम्ही गृहीत धरत आहोत आणि त्यादृष्टीने ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करत आहोत."
"पुढील इयत्तेत शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी पूर्वज्ञानावर अवलंबून असतात. त्या मुलांना आल्या पाहिजेत हा आमचा हेतू आहे." असं संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितलं.

ब्रिज कोर्सची आवश्यकता का आहे?

गेल्या वर्षीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अपेक्षित शिक्षण पोहचलेलं नाही. अनेक विद्यर्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाचीही सोय नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अपेक्षित आकलन झालेले नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे.

विद्यार्थ्यांचे जवळपास दोन वर्षांचे शैक्षणिक नुकसान झाले असून शाळा सुरू झाल्यानंतर ही पोकळी भरून काढल्याशिवाय पुढील इयत्तेचा अभ्यास शाळांनी सुरू करू नये अशीही काही शिक्षकांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर हा ब्रिज कोर्स तयार करण्यात येत असल्याचे समजते.

ब्रिज कोर्स संदर्भातील एका बैठकीत सहभागी झालेले शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचलेलं नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास, तिसरीत विद्यार्थ्यांची गुणाकाराची संकल्पना स्पष्ट झाली नाही तर चौथीत भागाकार करण्यात त्यांना अडचणी येणार. एकूणच विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहणार. हे केवळ एका विषयाच्या बाबतीत नाही तर प्रत्येक विषयाची ही परिस्थिती असू शकते."

"शाळा सुरू झाल्यानंतर थेट अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा शैक्षणिक नुकसान झालेली पोकळी भरून काढणं गरजेचं आहे. यासाठी ब्रिज कोर्स महत्त्वाचा आहे. केवळ पुस्तकी अभ्यासक्रम नव्हे तर विद्यार्थ्यांचे समुपदेशन त्यांचे मानसिक आरोग्य याचाही विचार व्हायला हवा." असंही त्यांनी सुचवलं.

'लर्निंग लॉस' म्हणजे नेमके काय?

राज्यातील अनेक शिक्षक ब्रिज कोर्ससाठी पूर्व तयारी करत असून यासंदर्भात शिक्षकांमध्येही मतेमतांतरे आहेत.

ब्रिज कोर्समध्ये केवळ पुस्तकी अभ्यासक्रमावर भर देण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, त्यांचे समुपदेशन अशा गोष्टींचीही दखल घेण्यात यावी असं मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केलं आहे.

लॉकडॉऊन काळात ग्रामीण, दुर्गम आणि अतीदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फटका बसल्याचे दिसून आले.

लॉकडॉऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या क्वेस्ट एज्यूकेशन संस्थेचे प्रमुख निलेश निमकर सांगतात, "दोन प्रकारचा लर्निंग लॉस असतो. पहिला म्हणजे यापूर्वी जे मुलांना येत होतं त्यातूनही मुलं थोडी मागे गेल्याचे दिसते. दुसरं म्हणजे यावर्षी जे शिकले असते तेवढे शिक्षणही त्यांच्यापर्यंत पोहचले नाही."

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात क्वेस्टा संस्थेने शंभरहून अधिक मुलांचे यासंदर्भात सर्वेक्षण केले. त्यानुसार, लॉकडॉऊनपूर्वी वाचून समजायचे अशी मुलंही आता यात मागे गेल्याचे दिसते.

ते सांगतात, "लॉकडॉऊन सुरू झालं तेव्हा मुलांना काहीतरी येत होतं. पण त्यातही मुलं मागे पडल्याचे दिसते. वर्षभर शिकली असती पण विद्यार्थ्यांना ती संधीही मिळाली नाही. ब्रिज कोर्सचा अर्थ हा मुलं कुठे आहेत तिथून शिकवायला सुरुवात झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची लेखी अभिव्यक्ती आणि बेसिक गणित याची चाचपणी करून तिथपासून शिकवायला सुरुवात केली पाहिजे."

स्त्रोत BBC Marathi News

धूमकेतू Dhumketu 2025