*भारतीय खेळणी जत्रा 2021*
*ITF 2021*
*प्रिय विद्यार्थी,पालक आणि शिक्षक मित्रहो,*
विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या हेतूने *आर्टस आणि अॅस्थेटिक्स विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली* यांचेमार्फत आपल्या *देशातील पहिली भारतीय खेळणी जत्रा २०२१ (India Toy Fair २०२१) चे ऑनलाईन पद्धतीने *दि. २७/२/२०२१ ते २/३/२०२१* या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान *मा. श्री. नरेंद्र मोदी* यांच्या हस्ते दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळातील शिक्षक, विद्यार्थी यांना भारतीय खेळणी जत्रा २०२१ यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी *https://theindiatoyfair.in/* यावर General visitor म्हणून नोंदणी करावी. देशातून 1000 पेक्षा जास्त सहभाग असलेल्या पहिल्या आभासी पद्धतीने होणाऱ्या खेळणी जत्रेचा आनंद घ्यावा.
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*
No comments:
Post a Comment