Youtube

Youtube
Chanel

Saturday, 27 February 2021

स्वाध्याय

*स्वाध्याय १६ आठवडा सुरू*

*आजपासून प्रत्येक  आठवड्यामध्ये स्वाध्याय अंतर्गत मराठी, उर्दू आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी दोन विषय उपलब्ध होतील. सोबतच विद्यार्थ्यांसाठी SWADHYAY मध्ये UDISE बंधनकारक करण्यात आले असून सर्व शिक्षकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करा. जेणेकरुन शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची कामगिरी पाहू शकता आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करू शकता.* 

*सर्व जिल्ह्यांसाठी एक ही लिंक. लिंकवर क्लिक करा आणि पुनः नोंदणीची आवश्यकता नाही*

सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -
*https://wa.me/918595524519?text=Namaskar*

Thursday, 25 February 2021

स्वाध्याय कार्यशाळा

स्वाध्याय लिंक

स्वाध्याय

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड आयोजित.....*

नांदेड जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, *प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक*( उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय सोडून ) यांची ऑनलाईन सभा ...
*विषय : डिजिटल स्वाध्याय व सहविचार सभा*

*दि. 25 फेब्रुवारी 2021*
*वेळ : दु. 12.00 वा.*

संस्थेतील सर्व ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, विषय सहाय्यक आणि जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी खालील झुम लिंक वरून जॉईन व्हावे 👇
https://us02web.zoom.us/j/81669845138?pwd=VW55QUpZQVg1cTgwblVROVFkTlkxZz09

Meeting ID : 816 6984 5138

Meeting pass code : 123
जिल्ह्यातील सर्व केंद्र प्रमुख, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी खालील you tube लिंक वरून जॉईन व्हावे 👇
https://youtu.be/IcSaWysX0rQ
आयोजक :-
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड.
शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, नांदेड.

भारतीय खेळणी जत्रा 2021

*भारतीय खेळणी जत्रा 2021*
*ITF 2021*

*प्रिय विद्यार्थी,पालक आणि शिक्षक  मित्रहो,*
विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या हेतूने *आर्टस  आणि  अ‍ॅस्थेटिक्स विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली* यांचेमार्फत आपल्या *देशातील पहिली भारतीय खेळणी जत्रा २०२१ (India Toy Fair २०२१) चे ऑनलाईन पद्धतीने  *दि. २७/२/२०२१ ते २/३/२०२१* या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहे. 

आपल्या  देशाचे पंतप्रधान *मा. श्री. नरेंद्र मोदी* यांच्या हस्ते  दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळातील शिक्षक, विद्यार्थी  यांना भारतीय खेळणी जत्रा २०२१   यामध्ये ऑनलाईन पद्धतीने  सहभागी होण्यासाठी *https://theindiatoyfair.in/* यावर  General visitor म्हणून नोंदणी करावी. देशातून 1000 पेक्षा जास्त सहभाग असलेल्या पहिल्या आभासी पद्धतीने होणाऱ्या खेळणी जत्रेचा आनंद घ्यावा.

*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*

Saturday, 6 February 2021

नवीन शैक्षणिक धोरण

*नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी :*
NEW EDUCATION POLICY 2020 :
*केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं*
नामकरण आता 
*"शिक्षण मंत्रालय"* असं होणार...

जाणून घेऊया :
*नवीन शिक्षण धोरण २०२०* यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
३४ वर्षांनंतर शिक्षण धोरण बदलले आहे. नवीन शिक्षण धोरणाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

— तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता...

— *५ वर्षे मूलभूत Fundamental :* 
१. नर्सरी            @ ४ वर्षे
२. जूनियर केजी @ ५ वर्षे
३. एसआर केजी @ ६ वर्षे
४. इयत्ता पहिली @ ७ वर्षे
५. इयत्ता दुसरी   @ ८ वर्षे

— *३ वर्षांची प्रारंभिक शाळा Preparatory :*
६. इयत्ता तिसरी  @ ९ वर्षे
७. इयत्ता चौथी   @ १० वर्ष
८. इयत्ता पाचवी @ ११ वर्षे

— *३ वर्षांची माध्यमिक शाळा Middle :*
९.   इयत्ता सहावी @ १२ वर्षे
१०. इयत्ता सातवी @ १३ वर्ष
११. इयत्ता आठवी @ १४ वर्षे

*४ वर्ष माध्यमिक शाळा Secondary :*
१२. इयत्ता नववी     @१५ वर्षे
१३. इयत्ता दहावीची @ १६ वर्षे
१४. एफ.वाय.जे.सी‌. @ 17 वर्षे
१५. एस.वाय.जे.सी. @ १८ वर्षे

*ठळक वैशिष्ट्ये :*

— बोर्ड फक्त १२ वीच्या वर्गाला असेल.
महाविद्यालयीन पदवी ४ वर्षांची. 
*दहावी मंडळ रद्द. SSC*
*एमफिल MPhil देखील बंद असेल.*

— *आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल...*
 
— *बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी...*
आता *बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.* तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.

— ९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील Semester Exam.
 *शालेय शिक्षण ५ + ३ + ३ + ४ सूत्रांच्या (वरील सारणी पहा) अंतर्गत शिकवले जाईल...* 

— महाविद्यालयीन पदवी ३ व ४ वर्षांची असेल. म्हणजेच, 
*पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल,* 
*दुसर्‍या वर्षी पदविका असेल*, तर 
*तृतीय वर्षात डिग्री मिळेल.*

— जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल...

— विद्यार्थ्यांना यापुढे एमफिल MPhil करावे लागणार नाही. म्हणजेच, *रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी* असेल. यानंतर ते थेट *पीएचडी PHD* करू शकतील. 

— दरम्यान विद्यार्थी इतर कोर्स करू शकतील. *उच्च शिक्षणामध्ये Higher Education* २०३५ पर्यंत एकूण सकल पट नोंदणी Gross Enrolment Ratio २०३५ पर्यंत ५०% पोहोचवण्याचं उद्दिष्ट...
 दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो...

— उच्च शिक्षणातही Higher Education अनेक सुधारणा केल्या आहेत. सुधारणांमध्ये 
*श्रेणीबद्ध शैक्षणिक Graded Academic,* *प्रशासकीय  Administrative* आणि 
*आर्थिक स्वायत्तता Financial Autonomy*
समाविष्ट आहे... 
त्याशिवाय ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्येही सुरू केले जातील. 
आभासी Vertual लॅब विकसित केल्या जातील. 
राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू होईल. देशात ४५ हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे...

*सर्व सरकारी Government,*
*खासगी Private* आणि 
*मान्यताप्राप्त संस्थांसाठी*
*Deemed University*
 समान नियम असतील...

— मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल...

— बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार...

— लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार...

— शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६% करणार, सध्या हे प्रमाण ४.४३% आहे...

— विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार...

 — सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल.‌..

या नियमानुसार नवीन शैक्षणिक सत्रे सुरू करता येतील. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा संदेश काळजीपूर्वक वाचावा...

Monday, 1 February 2021

कल्पना चावला स्मुर्तीदिन

*कल्पना चावला*

*प्रसिद्ध महिला अंतराळवीर*

*स्मृतिदिन - फेब्रुवारी १ इ.स. २००३*

आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी डॉ कल्पना चावला यांचा स्मृति दिन असून १७ वर्षांपूर्वी त्यांच्या कोलंबिया या यानाला पृथ्वीवर परत येत असताना अपघात होऊन दुर्दैवी मृत्यु झाला. त्यांच्यासोबत सहा अंतराळवीरांचा चमू देखील होता त्यांचा देखील या अपघातात दुर्दैवी अंत झाला. कल्पना चावला ह्या जन्माने भारतीय असलेल्या प्रथम महिला आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेल्या दूसरया भारतीय व्यक्ति होत्या. त्यांचा जन्म 1961 मध्ये हरियानामधील करनाल येथे झाला.कल्पना चावला यांच्या वडिलांचे नाव बनारसी लाल तर आईचे नाव संयोगिता चावला. त्यांच्या वडलांचे औद्योगिक वस्तु निर्मितीचा व्यवसाय होता आणि आई घर सांभाळायची. त्यांच्या आईला आपल्याला मुलगा व्हावा अशी इच्छा होती पण त्यांना कुठे ठावूक होते कि आपली मुलगी संपूर्ण जगात नाव कमावेल! त्यांचे शिक्षण टागोर विद्यालय येथून झाले. 1982 साली त्या अमेरिकेत गेल्या. 1984 साली त्यांनी टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस इंजीनिरिंग ची मास्टर ऑफ़ सायन्स ही पदवी मिळविलि. त्यांना अन्तराळविर होण्याच्या स्वप्नाने असे पछाडले होते की त्या वेळेस झालेल्या च्यालेंजर यान अपघाताची चर्चा देखिल त्यांना त्यांच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही. त्यांनी 1986 मध्ये दूसरी मास्टर पदवी आणि 1988 मध्ये कोलेराडो मधून एरोस्पेस मध्ये डॉक्टरेट मिलविलि. 1988 मध्ये त्यांनी नासातील एम्स रिसर्च सेंटर ओवरसेट मेथड्सच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहिले. तेथे त्यांनी कोम्प्यूटेशनल फ्लूइड डायनामिक्स मध्ये जागेवरच उभे उड्डाण, कमी अंतरात उड्डाण आणि जमिनीवर उतरणे या विषयांवर संशोधन केले.   त्यानंतर त्यांना ग्लाइडर्स, सीप्लेन्स तसेच एक किंवा अनेक इंजिन असलेली विमाने यांच्या व्यवसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा परवाना मिळाला.1991 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी नासामध्ये अॅस्ट्रॉनॉट कॉर्प्स होण्यासाठी अर्ज केला. त्यांना मार्च 1995 साली तेथे प्रवेश मिळाला. त्यांनंतर त्यांची 1996 मध्ये पहिल्या उड्डानासाठी निवड झाली.  यानात शून्य गुरुत्त्वकर्षणाच्या अवस्थेत असताना  त्या म्हणाल्या "तुमचे अस्तित्व हे तुमच्या हुशारीमुळे असते". त्यांनी अंतराळात 10.67 दशलक्ष किमि प्रवास केला हे अंतर 252 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याएवढे होते.त्यांची पाहिली अंतराळ मोहीम 19 नोव्हेंबर 1997 रोजी चालु झाली. त्या 6 अंतराळविरांच्या चमुचा एक भाग होत्या.व  हा चमु कोलंबिया स्पेस शटल एस.टी.एस 87 चे चालन करत होता.  त्यांच्या पहिल्या मोहिमेत त्या 372 तास अंतराळात होत्या. एस.टी.एस-87 मोहिमेदरम्यान त्यांच्यावर नादुरुस्त असलेला स्पार्टन उपग्रह विंस्टन स्कॉट आणि तकाओं दोई यांच्याबरोबर स्पेसवॉक करुन तो दुरुस्त करने ही जबाबदारी होती. या मोहिमेनंतर त्यांना अंतराळ स्थानकावर काम करायचे होते.चावला यांना 2000 साली त्यांच्या दुसऱ्या उड्डानासाठी एस.टी.एस 107 च्या चमु साठी देखिल निवडण्यात आले होते. परंतु ही मोहीम वारंवार आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे लांबलि जात होती. 16 जानेवारी 2003 रोजी चावला दुर्दैवी एस. टी. एस.107 मोहिमेवर जाण्यासाठी कोलंबिया अंतराळ मोहिमेवर आल्या.  चावला यांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात प्रयोग करणे ज्यामध्ये ते आणि त्यांच्या चमूला जवळ जवळ 80 प्रयोग करावयाचे असून त्यात पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान निर्मिति, अंतराळविरांचे आरोग्य आणि सुरक्षितता या विषयांचा समावेश होता.चावला यांचा मृत्यु 1 फेब्रुवारी 2003 रोजी अंतराळ यान कोलंबियाच्या टेक्सास येथे पृथ्वीच्या वातावरणात पुनरप्रवेश आणि करताना जमिनीवर उतरताना  अपघातात झाला. त्यांच्यासोबत असलेल्या सर्व चमूचा त्यात दुर्दैवी अंत झाला.त्यांना मरणोत्तर  कांग्रेशनल स्पेस चे सन्मान पदक, नासा स्पेस फ्लाइट चे पदक तसेच नासा विशेष सेवा पदक बहाल करण्यात आले. कल्पना चावला यांच्या नावाने आय.एस.यू. शिष्यवृत्ति फंड हा इंटरनॅशनल स्पेस यूनिवर्सिटी (आय.एस.यू.) द्वारा आंतरराष्ट्रीय अंतराळ शिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 2010 साली सुरु करण्यात आला आहे.  द कल्पना चावला मेमोरियल स्कोलरशिप प्रोग्राम भारतीय विद्यार्थी संघटना, टेक्सास विद्यापीठ, अल पासो यांनी 2005 पासून गुणवंत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुरु केला आहे.'द कल्पना चावला आउटस्टैंडिंग रीसेंट अलुम्नी अवार्ड' हा कोलाराडो विद्यापीठाने जो 1983 पासून दिला जातो त्याचे नामकरण डॉ चावला यांच्या नावाने केले.  करनाल मध्ये चावला यांच्या जन्मगावि 30 हजार शालेय मुले आणि नागरिक यांनी हातात हात धरून 36.4 किमी लांब मानवी साखळी केलि होती. ही साखळी कल्पना चावला यांच्या नावाने शाहरामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे याच्या समर्थनासाठी होती. 'कल्पना चावला मेडिकल कॉलेज निर्माण कमिटी' यात वेगवेगळ्या संस्थांचे  स्वयंसेवक आणि कार्यकर्ते तसेच चौतीस शाळांमधील विद्यार्थी यांचा समावेश होता.18 नोव्हेंबर 2013 रोजी राज्य सरकारने पायाभरणी करतानाचा दगड त्यांच्या स्मृति निमित्त रोवण्यात आला.त्यांच्या स्मरणार्थ 51826 या अशनिला त्यांचे नाव देण्यात आले.5 फेब्रुवारी 2003 मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी हवामान विषयीच्या उपग्रहाला कल्पना-1 हे नाव दिले. त्यानंतर सोडलेल्या उपग्रहाला कल्पना-2 हे नाव देण्यात आले. हरियाणा सरकारने कल्पना चावला यांच्या नावाने ज्योतिसार,कुरुक्षेत्र येथे प्लेनेटेरियम सुरु केले.नासाने त्यांनी बनविलेल्या सुपर कंप्यूटरला कल्पना चावला यांचे नाव दिले.कल्पना चावला त्यांच्या मित्र आणि सहकर्मी यांच्यात के.सी नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांची आई सांगते कल्पना हि एक वेगळीच मुलगी होती. ती स्व:ताचे केस स्वतःच कापत असे, तीला कधी इस्त्री केलेले कपडे लागत नसत,तिने कराटेचे प्रशिक्षण घेतले होते. त्या पंजाब इंजिनियरिंग कॉलेज मधे अव्वल होत्या त्यांना त्याच कॉलेज ने नोकरी सूध्धा देवू केली होती. त्यांचे भाऊ संजय चावला म्हणतात कि, "माझी बहिण मरण पावलेली नाही तर ती अमर झाली आहे. ती एक आकाशातील कायमचा तारा झालेली आहे आणि तिच्या हक्काच्या जागेवर म्हणजेच आकाशात कायमची राहणार आहे"  त्या या शतकातील काही आदर्शांपैकी एक आहेत त्या सदैव आपल्या नावाशी जणू प्रामाणिकच राहिल्या. त्या आपल्याला त्यांचे धैर्य, जिद्द, चिकाटि, त्यांनी केलेले बलिदान आणि देशाला मिळवून दिलेला अभिमान यासाठी नेहमीच आठवणीत राहतील.

https://m.facebook.com/vidnyandinvishesh

👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर *Request* टाइप करुन *(फक्त whatsapp किंवा Telegram वरच)* पाठवा.

धूमकेतू Dhumketu 2025