कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला जात आहे.
या अन्वये प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण १७,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्याशाळा सुरु करण्यात आलेल्या असल्या तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल ट्ूल्सचा यशस्वी व प्रभावी वापर करता येणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक रांशोधन व प्रशिक्षण परिषद, गहाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनाराठी उपयुक्त असे "Digital Tools for Education" या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन दिनांक २२ व २३ जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये सकाळी १०ते११:३० या वेळेमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या YouTube चॅनेलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहे.
सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गुगल ट्ूल्राच्या वापराबाबत प्रात्यक्षिकाराह सविस्तर असे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
वेबिनारकरिता उपस्थित राहणयासाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्वशिक्षकांनी https:/tinyurl.com/y5ozz209 या लिंकवर नाव नोंदणी करावी. सदर लिंकवर नावनोंदणी केल्यावरच संबंधित शिक्षकास वेबिनारची लिंक SMS द्वारे प्राप्त होईल.
तरी राज्यातील सर्व शिक्षकांना सदर प्रशिक्षणाचा लाभ घेता यावा यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे.
व्हाटसअपवर शेअर करा
Thursday, 21 January 2021
Digital tools for education
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre
No comments:
Post a Comment