Youtube

Youtube
Chanel

Friday, 11 December 2020

बाल चित्रपट महोत्सव

*Press Note*
*रोटरी इंडिया लिटरसी मिशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन *
रोटरीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचे दि. ९ डिसेम्बर २०२० रोजी रोटरी इंटरनॅशनलचे नियोजित अध्यक्ष मा. शेखर मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. जगभरातील ४०हून अधिक देशामधील मुले यामध्ये सहभागी होत आहेत. या महोत्सवामध्ये विविध देशामधील १५० फिल्म्स पाहण्याची संधी मुलांना मिळणार असून सिनेमा कसा बनवावा यासाठी विविध कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. देश आणि विदेशातील नामवंत कलाकार आणि दिग्दर्शक त्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यामाध्यमातून तयार झालेल्या फिल्म्स आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवडल्या जातील आणि विजेत्या स्पर्धकांना इटलीमध्ये जाण्याची संधी मिळेल. सर्व शाळांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी प्रांत ३१३२ चे प्रांतपाल हरीश मोटवाणी , झोनल कोऑर्डिनेटर झुबीन अमारिया आणि लिटरसी विभाग प्रमुख स्वाती हेरकळ  यांनी केले आहे. KRAYON या अँपच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम राबवले जाणार आहेत. आपल्या स्मार्ट फोनवर हे अँप डाउनलोड करून घ्यावे. वापरण्यास अत्यंत सुलभ असे हे अँप वरून ३० डिसेंबर पर्यंत  शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या आंतरराष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव द्यावा. हा उपक्रम पूर्णपणे मोफत असून सर्व जगभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025