*मोफत ऑनलाईन लेखन कार्यशाळा सप्ताह*
विश्व मराठी ऑनलाईन संमेलना निमित्त *महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषदेच्या वतीने सात मोफत लेखन कार्यशाळांचे आयोजन* केले आहे.
विश्व मराठी परिषदेने जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन पहिल्या विश्र्व मराठी संमेलना निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाईन लेखन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या संमेलना निमित्ताने नि:शुल्क ऑनलाईन कार्यशाळांचा हा अभिनव प्रयोग आहे. त्याचा लाभ जगभरातील नवोदित मराठी लेखकांनी घ्यावा असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.
कार्यशाळांचे विषय: १) यशस्वी लेखक - कॉपीराईट, आय एस बी इन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इ. ( १० डिसेंबर ) २) कादंबरी लेखन ( ११ डिसेंबर ) ३) संशोधन पद्धती व उपयोजन ( १२ डिसेंबर ) ४) अनुवाद कसा करावा ( १३ डिसेंबर ) ५) ब्लॉग लेखन ( १४ डिसेंबर ) ६) कथा लेखन ( १५ डिसेंबर ) ७) कविता लेखन ( १६ डिसेंबर )
कार्यशाळा मोफत आहेत. कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.sammelan.vmparishad.org/nondani
येथे नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क
दैदिप्य जोशी - समन्वयक - विश्व मराठी परिषद
मो.+९१ ९०२१७ ३२३३७
यांना संपर्क करावा
No comments:
Post a Comment