Monday, 21 December 2020
21 डिसेंबर रात्री 7.30 to 9.30
सरत्या वर्षात *२१ डिसेंबरची रात्र* आपल्यासाठी एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. २१ डिसेंबरला रात्री *साडेसात ते साडेनऊ* या वेळात पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या *सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत.* हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. 🌎पृथ्वीवर आज घडीला जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिलेले नाही आणि या नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात *गुरु आणि शनी* हे ग्रह जवळ येण्याची घटना दर २० वर्षांनी घडते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ आहेत ते *यापूर्वी ४०० वर्षांपूर्वी घडले होते.* या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते. *आपल्या ग्रहमालिकेत गुरु पाचवा तर शनी सहावा ग्रह आहे पण दोघांच्या सूर्यप्रदक्षिणेला लागणारा काळ वेगवेगळा आहे.* या पूर्वी असा योग १६ जुलै १६२३ रोजी आला होता आणि त्यावेळी *दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ जिवंत होता पण दुर्बिणीचा शोध त्यावेळी लागलेला नव्हता.* जेव्हा 🌕🟠दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. याबाबत मुंबई येथील नेहरू तारांगणचे अरविंद परांजपे म्हणाले, *"गुरू"* 🌕हा सूर्याची एक परिक्रमा ११.८७ वर्षांनी पूर्ण करतो. तर 🪐 *"शनिला"* २९.५० वर्षे लागतात. या दोन्हींचा परिणाम असा, की दर सुमारे १९ वर्षे आणि ७ महिन्यांनी या ग्रहांची महायुती होते. पण, प्रत्येक महायुतीवेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात. दि.२१ डिसेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.१ अंश कोनीय (अर्थात ६ कला आणि ६ विकला) अंतरावर असतील. ज्यांची नजर तेज आहे अश्या लोकांना *२१ डिसेंबर रोजी 🪐🌙शनीचा चंद्र टायटन हाही दिसू शकेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre
No comments:
Post a Comment