*आज रात्री १७ नोव्हेंबरला उल्कावर्षाव*
काळोख्या रात्रीत अवकाशात उल्कावर्षाव पाहणे हा एक सुखद अनुभव असतो. खास करून खगोलप्रेमींसाठी. असा सुखद अनुभव घेण्याची संधी चालून आली आहे ती आज मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबरच्या रात्री, आज रात्री १२ नंतर पूर्व आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव पाहायला मिळेल.
खरंतर हा उल्कावर्षाव दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पहायला मिळतो. त्यात १७ नोव्हेंबरला हा वर्षाव उच्चतम असतो.
या उल्कावर्षावासाठी *टेम्पल-टटल* हा धूमकेतू कारणीभूत आहे. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्यमालेची एक फेरी पुर्ण करतो. त्याने सोडलेल्या कचऱ्याजवळून पृथ्वी दरवर्षी नोव्हेंबरच्या काळात जात असल्याने घर्षणामुळे येथे उल्कावर्षाव पहायला मिळतो. १७ नोव्हेंबरला ताशी सुमारे ४० उल्का पहायला मिळतात. या उल्कांचा वेग सेकंदाला ७१ कि.मी. इतका असतो.
३३ वर्षांनी या राशीत प्रचंड उल्कावर्षाव होतो. या वेळेस ताशी १०,००० (दहा हजार) इतक्या उल्का दिसतात म्हणजे उल्काचा पाऊसच थोडक्यात. सन १९६६रोजी असा उल्कावर्षाव पहायला मिळाला होता. त्याला *लीयोनिड्स*(Leonids) असे म्हणतात.
मग, व्हा तयार आजच्या रात्री हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी. दिवाळीला फटाक्यांच्या लहरी पाहण्यापेक्षा उल्काच्या लहरी पाहणे कितीतरी आनंददायी असते. एकदा अनुभव घ्या म्हणजे समजेल.
No comments:
Post a Comment