Youtube

Youtube
Chanel

Thursday, 10 September 2020

महाकरिअर पोर्टल

💯 *Urgent* 💯
   
    *महाकरिअरपोर्टल* 

 *👩‍🎓*विद्यार्थ्यांच्या करिअरचे परिपूर्ण व्यासपीठ.* 👨‍🎓

होय,

 *इ. ९ वी ते इ. १२ वी* तील विद्यार्थ्यांना करिअर विषयक आवश्यक सर्व माहिती *एका क्लिक* वर उपलब्ध व्हावी. तसेच
 राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना *करीअर विषयक परिपूर्ण मार्गदर्शन  मिळण्याची समान संधी* मिळावी.
करिअर निवड त्यासंदर्भात अगदी *विषय, प्रवेश परीक्षा, पात्रता परीक्षा तसेच शिष्यवृत्ती* याबाबतीत सर्व माहिती *एकाच छताखाली* मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे *महाकरिअर पोर्टल.* 
  याशिवाय संबंधित *करिअर* किंवा *शिक्षणाची* महत्त्वाची *कॉलेज तसेच संस्था* यांची माहिती दिली आहे.
    यासाठी सर्व प्रथम *महाराष्ट्रातील शासकीय, अनुदानित, खाजगी अनुदानित, शाळा , आश्रम शाळा आणि महाविद्यालयातील* इयत्ता *9 ते 12 वी* च्या विद्यार्थ्यांचे *रजिस्ट्रेशन*  होणे आवश्यक आहे.
यासाठी विद्यार्थ्यांनी आपला *सरल आयडी*  टाकून *लॉग इन* करणे *saral id* हा एकोणीस अंकी असतो. तो संबंधित *वर्गशिक्षक तसेच संबंधित शाळेच्या कार्यालयातून* घेऊ शकतो. आणि *password* हा *123456 असून सर्वांसाठी एकच आहे.* 

      माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपला विद्यार्थी कोणत्याही बाबतीत मागे राहू नये.
यासाठी *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, युनिसेफ आणि आस्मा फाऊंडेशन यांच्या वतीने हे  महाकरिअर पोर्टल सुरू केले आहे.* 
खालील *लिंक वर क्लिक* करुन *विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन* करायचे आहे आणि वेळोवेळी त्या पोर्टल ला भेट द्यायची आहे.

http://mahacareerportal.com

   
यासाठी 
   राज्यातील सर्व *खाजगी अनुदानित शाळा / ज्युनिअर कॉलेजच्या संस्थांचे अध्यक्ष / सचिव* यांनी तसेच
 *शासकीय, अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य/ मुख्याध्यापक* यांनी आपल्या सर्व  विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करून घेणे आणि त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

    
  असे आवाहन नाशिक विभाग समुपदेशक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

   याबाबतीत वेळोवेळी वेबनार मिटिंग चे आयोजन करण्यात आलेले आहेत.

  आज नाशिक जिल्ह्यातील सर्व समुपदेशक , डायट विभाग, शिक्षण विभाग(माध्यमिक)तसेच विभागीय कार्यालय(शिक्षण विभाग) आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील पदाधिकारी उपस्थित होते.

   यात श्री. दिपक माळी साहेब सहाय्यक संचालक आणि श्री. श्याम राऊत राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे,  श्रीमती पुष्पावती पाटील मॅम सहाय्यक संचालिका नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय (शिक्षण विभाग) आणि नाशिक डायट चे जिल्हा समन्वयक श्री. डॉ. बाबासाहेब बढे आदी मान्यवर उपस्थित होते.

शब्द रचना:-  
श्री. विनोद पानसरे सर

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025