Youtube

Youtube
Chanel

Wednesday, 29 July 2020

नविन शैक्षणिक धोरण

नवी दिल्ली : नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. देशातील शिक्षण व्यवस्थेत या धोरणा अंतर्गत अमूलाग्र बदल केले जाणार आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा अधिकार (RTE- Right to Education) या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. तर दहावी-बारावी बोर्डाचे महत्त्वही कमी केले जाणार आहे. विशेष म्हणजे इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम केले जाईल. (Cabinet under PM Narendra Modi gives approval to New Education Policy)

नव्या धोरणाच्या मसुद्यात मुलांच्या वयाऐवजी विकासाच्या टप्प्यांवर आधारित 5 + 3 + 3 + 4 असा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक रचना
5 वर्षे - वय 3-8 वर्षे : पूर्व प्राथमिक तीन वर्षे आणि इयत्ता 1 ली 2 री
3 वर्षे - वय 8-11 वर्षे : प्राथमिक शिक्षण - इयत्ता 3री ते 5वी
3 वर्षे - वय 11-14 वर्षे : पूर्व माध्यमिक शिक्षण - इयत्ता 6वी ते 8वी
4 वर्षे - वय 14-18 वर्षे : माध्यमिक शिक्षण - इयत्ता 9वी ते 12 वी

महत्त्वाचे नऊ मुद्दे

1) अंडर ग्रॅज्युएट महाविद्यालये अधिक स्वायत्त असतील
2) दहावी आणि बारावीच्या मार्कशीटमध्ये 'कौशल्य' आणि 'क्षमता' विभाग असेल;
3) विद्यार्थी एकत्रितपणे दोन शाखांचा अभ्यास करु शकतात
4) 5 + 3 + 3 + 4 मॉडेलनुसार शाळेसाठी 12 वर्षे
5) उच्च शिक्षण अभ्यासक्रमात विषयांसाठी अधिक लवचिकता
6) वंचित प्रदेशासाठी 'सेझ' (विशेष आर्थिक क्षेत्र)
7) आठवीपर्यंत प्रादेशिक भाषा अनिवार्य
8) उच्च शिक्षणासाठी एकल नियामक (सिंगल रेग्युलेटर)
9) पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत

मोठ्या बदलांसह देशाचं नवं शैक्षणिक धोरण

34 वर्षांनंतर नवे शैक्षणिक धोरण जाहीर

पाचवीपर्यंत मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न

आता शिक्षणाचा 5 +3 +3+ 4 पॅटर्न

10वी, 12वा बोर्डांचं महत्व जास्त नसणार

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्व

विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार

सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश

शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर

सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता

शालेय अभ्यासक्रमही आता बदलणार

शिक्षकांच्या अभ्यासक्रमातही बदल असणार

एका वर्षात किमान 2 वेळा परीक्षांची संधी

पदवीसाठी कला आणि विज्ञानात कठोर भेद न राखता विषय निवडण्याची मुभा

सर्व विद्यापीठांसाठी समान नियम

प्रादेशिक भाषांमध्येही ई-कोर्सेस विकसित केले जातील; व्हर्चुअल लॅबही विकसित केल्या जाणार आहेत. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (एनईटीएफ) तयार केले जात आहेत, असे बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. याआधी 1986 मध्ये तयार केलेले शैक्षणिक धोरण 1992 मध्ये सुधारण्यात आले होते. आता त्याची जागा 'शैक्षणिक धोरण 2019' घेणार आहे. त्यासोबतच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले आहे. रमेश पोखरीयाल 'निशंक' यांच्याकडे याची धुरा आहे.

दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30%, यंदाही मुलींची बाजी

तीन वर्षे वयोगटापासून 18 वर्षांपर्यंतची मुले आता शिक्षणाचा अधिकार या कायद्याच्या कक्षेत येतील. सध्या, हा कायदा केवळ 14 वर्षे वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि 2025 पर्यंत सर्वांना मूलभूत साक्षरता प्रदान करणे, हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.

नव्या शैक्षणिक धोरणात काय काय?

कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर संबोधले जाणार नाही

नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिक अभ्यासाची तरतूद आहे. दोन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये भाषा पटकन शिकण्याची क्षमता असते. बहुभाषिकत्वाचे फायदे असल्याने मुले या वयात तीन भाषा शिकतील. भारताच्या अभिजात भाषांवरही लक्ष केंद्रित केले जाईल.

या धोरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह कृषी शिक्षण, कायदा शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणही याच कक्षेत आणले गेले आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुकूल (फ्रेंडली) शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाणार आहे.

'राष्ट्रीय शिक्षण आयोगा'ची स्थापना करण्याची आणि खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याची शिफारसदेखील नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे.

5+3+3+4 पॅटर्न आहे तरी कसा ?

5 वर्षे - वय 3-8 वर्षे : पूर्व प्राथमिक तीन वर्षे आणि इयत्ता 1 ली 2 री
3 वर्षे - वय 8-11 वर्षे : प्राथमिक शिक्षण - इयत्ता 3री ते 5वी
3 वर्षे - वय 11-14 वर्षे : पूर्व माध्यमिक शिक्षण - इयत्ता 6वी ते 8वी
4 वर्षे - वय 14-18 वर्षे : माध्यमिक शिक्षण - इयत्ता 9वी ते 12 वी

महत्त्वाचे नऊ मुद्दे

1) अंडर ग्रॅज्युएट महाविद्यालये अधिक स्वायत्त असतील
2) दहावी आणि बारावीच्या मार्कशीटमध्ये 'कौशल्य' आणि 'क्षमता' विभाग असेल;
3) विद्यार्थी एकत्रितपणे दोन शाखांचा अभ्यास करु शकतात
4) 5 + 3 + 3 + 4 मॉडेलनुसार शाळेसाठी 12 वर्षे
5) उच्च शिक्षण अभ्यासक्रमात विषयांसाठी अधिक लवचिकता
6) वंचित प्रदेशासाठी 'सेझ' (विशेष आर्थिक क्षेत्र)
7) आठवीपर्यंत प्रादेशिक भाषा अनिवार्य
8) उच्च शिक्षणासाठी एकल नियामक (सिंगल रेग्युलेटर)
9) पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत

मोठ्या बदलांसह देशाचं नवं शैक्षणिक धोरण

34 वर्षांनंतर नवे शैक्षणिक धोरण जाहीर

पाचवीपर्यंत मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच शिक्षण

पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न

आता शिक्षणाचा 5 +3 +3+ 4 पॅटर्न

10वी, 12वा बोर्डांचं महत्व जास्त नसणार

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्व

विद्यार्थ्यांचं ते स्वत:, सहविद्यार्थी, शिक्षक मूल्यांकन करणार

सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश

शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर

सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता

शालेय अभ्यासक्रमही आता बदलणार

शिक्षकांच्या अभ्यासक्रमातही बदल असणार

एका वर्षात किमान 2 वेळा परीक्षांची संधी

पदवीसाठी कला आणि विज्ञानात कठोर भेद न राखता विषय निवडण्याची मुभा

सर्व विद्यापीठांसाठी समान नियम

प्रादेशिक भाषांमध्येही ई-कोर्सेस विकसित केले जातील; व्हर्चुअल लॅबही विकसित केल्या जाणार आहेत. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (एनईटीएफ) तयार केले जात आहेत, असे बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. याआधी 1986 मध्ये तयार केलेले शैक्षणिक धोरण 1992 मध्ये सुधारण्यात आले होते. आता त्याची जागा 'शैक्षणिक धोरण 2019' घेणार आहे. त्यासोबतच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले आहे. रमेश पोखरीयाल 'निशंक' यांच्याकडे याची धुरा आहे.
तीन वर्षे वयोगटापासून 18 वर्षांपर्यंतची मुले आता शिक्षणाचा अधिकार या कायद्याच्या कक्षेत येतील. सध्या, हा कायदा केवळ 14 वर्षे वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि 2025 पर्यंत सर्वांना मूलभूत साक्षरता प्रदान करणे, हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.

नव्या शैक्षणिक धोरणात काय काय?

कला, क्रीडा, संगीत, योग, समाज सेवा या विषयांना अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर संबोधले जाणार नाही

नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिक अभ्यासाची तरतूद आहे. दोन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये भाषा पटकन शिकण्याची क्षमता असते. बहुभाषिकत्वाचे फायदे असल्याने मुले या वयात तीन भाषा शिकतील. भारताच्या अभिजात भाषांवरही लक्ष केंद्रित केले जाईल.

या धोरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह कृषी शिक्षण, कायदा शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणही याच कक्षेत आणले गेले आहेत.

दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुकूल (फ्रेंडली) शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाणार आहे.

'राष्ट्रीय शिक्षण आयोगा'ची स्थापना करण्याची आणि खासगी शाळांना अनियंत्रित फी वाढविण्यापासून रोखण्याची शिफारसदेखील नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे.

Sunday, 26 July 2020

डाॕ.राजेंन्द्र भारुड सर संघर्ष कथा

*भिल्ल समाजातील प्रथम ‘कलेक्टर’ डॉ. राजेंद्र भारूड. त्यांच्या संघर्षाची आणि उमेदीची ही गोष्ट.* 

(डॉ. राजेंद्र भारूड)


माझा जन्म कोणाच्या घरात आणि कोणत्या समाजात व्हावा हे माझ्या हातात नव्हतं. मी साक्री तालुक्यातीला सामोडे गावात  भिल्ल जमातीत जन्म घेतला आणि माझं जगणं सुरू झालं.  जगताना पावलो पावली संघर्ष होता, अडचणी होत्या. परिस्थिती  प्रतिकूल होती; पण त्याचा बाऊच करत राहिलो असतो तर आज ही आयएएस ऑफिसर्पयतची मजल गाठता आलीच नसती.
मला माझ्या आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळाली नाही, किंबहुना मिळालीच नाही. अभावाच्या या जगण्याला निसर्गाची भक्कम सोबत होती. निसर्गाचा सहवास होता म्हणून लढायला ताकद मिळाली. उसाच्या पालाची झोपडी म्हणजे माझं घर. मी मायच्या पोटात होतो तेव्हाच वडील वारले. घरची एवढी गरिबी की वडिलांचा साधा फोटो काढायलाही पैसे नव्हते. माझे वडील कसे होते हे मला कधीच कळलं नाही. आमच्याकडे ना जमीन होती ना शेती. घरात कर्ता पुरुषही नव्हता. मायवरच सगळी जबाबदारी येऊन पडली; पण ती डगमगली नाही की कधी रडली नाही. ती पोट चालवण्यासाठी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय करत होती. घरातच चालायचा तो. पिणारेही घरीच यायचे. माय सांगते, मी लहान होतो. दुधासाठी रडायचो; पण दारू पिणार्‍यांना त्रास नको म्हणून माझ्या तोंडात दुधाऐवजी दारूचे थेंब टाकायचे. म्हणजे मी गपगुमान झोपून घेईन. मोठा झालो आणि मग दारू पिणार्‍यांना चणे, फुटाणे, चकना आणून देऊ लागलो. हे काम करणं भागच होतं. पण म्हणून मायनं आम्हाला फक्त याच कामाला जुंपलं नाही. मोठय़ा भावाला आश्रमशाळेत घातलं आणि मला जिल्हा परिषदेच्या शाळेत. शाळेत जाऊन मन लावून शिकत होतो. घरी येऊन अभ्यास करत होतो. पेन, पेन्सिल घ्यायलाही पैसे नसायचे, पण शिकायला छान वाटत होतं. आमच्या जमातीत शिकायला जाणारी आमची ही पहिलीच पिढी होती. 
पण आमचं शिकणं इतर कोणाला महत्त्वाचं वाटण्याचं कारणंच नव्हतं. आमचा जन्म म्हणजे सांगितलेली कामं करण्यासाठीच. एकदा परीक्षा होती. ओटय़ावर बसून अभ्यास करत होतो. दारू प्यायला आलेल्या एकानं मला चकना आणून देण्यास सांगितलं; पण परीक्षेमुळे मी सरळ नाही सांगितलं. समोरचा चिडला आणिशिकून असा कोणचा डॉक्टर - इंजिनिअर होणार असं म्हणून मला हिणवलं. मायला ते शब्द खूप लागले. आणि होईल माझं पोर डॉक्टर- इंजिनिअर असं ठामपणे म्हणून गेली.
त्या माणसाच्या हिणवण्यानं मला खूप वाईट वाटलं. आपली परिस्थिती आपल्याच बळावर बदलण्याचाही आपल्याला हक्क नाही का, असा विचार आला. पण क्षणभरच. मायनं माझ्यावर दाखवलेला विश्वास मोठा होता. हा विश्वास खरा करायचं ठरवलं. 
पुढे अक्कलकुवा तालुक्यातल्या नवोदय विद्यालयात सीबीएसई अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. गावापासून 150 किमी दूर होती शाळा. माय आली होती सोडवायला. मायपासून दूर कसं राहायचं या विचारानंच रडायला आलं. मायही खूप रडत  होती; पण मायपासून दूर राहून शिकणं भाग होतं. मायची पाठ फिरल्यानंतर मी ठरवून टाकलं ही संधी अशी वाया जाऊ द्यायची नाही. संधीचं चीज करायचंच. मी घरापासून दूर राहून शिकत होतो. मन लावून अभ्यास करत होतो. दहावीला उत्तम गुणांनी पास झालो. बारावीला 97 टक्के गुण मिळाले. आणि स्वतर्‍च्या गुणांच्या जोरावर मुंबईतील जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. वैद्यकीय शिक्षणासाठी खूप स्कॉलरशिप मिळाल्या. त्याच्या जोरावर शिक्षणाचा खर्च चालू होता. बारीकसारीक खर्चाचे पैसे माय पाठवत होती. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो; पण तरीही आईचा मोहाची दारू बनवण्याचा व्यवसाय चालूच होता. तो बंद केला असता तर मला पैसे कसे पुरवता आले असते. 
एम.बी.बी.एस.च्या  शेवटच्या वर्षाला होतो. एकीकडे इण्टर्नशिप चालू होती आणि दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास. मायचे कष्ट हीच माझी प्रेरणा होती. बाकी माझ्या मायला माझ्या शिकण्याचा काहीच गंध नव्हता. मायला तर मी फक्त डॉक्टरकीच करतो आहे असं वाटत होतं. यूपीएससीची परीक्षा काय असते? कशासाठी असते? कलेक्टर होण्यासाठी काय करायचं असतं हेच तिला माहीत नव्हतं. तिनं तर तोर्पयत तिच्या आयुष्यात गावात कधी प्रांत आणि तहसीलदारही आलेला बघितला नव्हता. आणि मी आयएएस ऑफिसरची तयारी करत होतो. वर्ष संपलं. आणि माझ्या एका हातात एम.बी.बी.एस.ची पदवी आणि दुसर्‍या हातात यूपीएससी क्रॅक केल्याचा निकाल होता. 
घरी मोठी मोठी मंडळी माझ्या अभिनंदनासाठी येत होती. कलेक्टर, तहसीलदार, पुढारी. मायला काही कळतच नव्हतं की इतकी लोकं का येताहेत. मी मायला सांगितलं की मी डॉक्टरकी पास झालो. मायला खूप आनंद झाला; पण मी लगेच सांगितलं की मी डॉक्टरकी सोडली. मायला काही कळेचना. मी म्हटलं की डॉक्टरकी सोडली कारण मी आता कलेक्टर झालो  आहे. मायला एवढंच समजत होतं की आपलं पोरगं खूप मोठं काहीतरी बनला आहे. माझे नातेवाईक, गावातील भिल्ल समाजातील इतर माझे समाजबांधव यांनापण छान वाटलं. पण त्यांनाही कलेक्टरचा अर्थ काही कळत नव्हता. लोकांनी तर ‘आपला राजू कंडक्टर झाला’ म्हणत माझं कौतुक केलं. 
माझी पोस्टिंग कलेक्टर म्हणून नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. 2012 पासून माझी माय आता माझ्या सोबत आहे. इथे मला करण्यासारखं खूप आहे. नंदुरबार म्हणजे पूर्ण आदिवासी जिल्हा. शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सर्वच बाबतीत कामाची, सुधारणांची नितांत गरज आहे. आणि ते करण्यासाठीच मी या पदावर आहे.  
आज मला अनेकजण विचारतात की माझं अख्खं बालपण, तरुणपण परिस्थितीशी दोन हात करता करता संपलं. या अवस्थेतलं जगणं मला अनुभवताच आलं नाही. पण मी म्हणतो की संघर्ष करत होतो म्हणूनच माझ्यात ताकद येत होती. अख्खं बालपण उघडय़ा आकाशाखाली निसर्गाच्या सोबतीनं गेलं. खेळायला आंब्याच्या कोयी होत्या. विटी-दांडू होते. नदीत पोहोत होतो. डोंगर चढत होतो. शरीर आणि मन दोन्हीही घट्ट होत होतं. तेव्हा माझ्या आजूबाजूला तरी कोण होतं. माझी माय, माझीच माणसं. सगळेच गरीब. सगळ्यांच्या पोटाला अर्ध पोटी राहण्याची, पोटाला चिमटा काढत रात्र घालवण्याची सवय. त्यामुळे अमक्याला अमुक मिळतंय, चांगलं खायला-प्यायला मिळतंय आणि आपल्याला मात्र उपाशी राहावं लागतंय असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. सगळे सारखे. कोणाच्या आनंदानं स्वतर्‍च्या परिस्थितीला, दैवाला दोष लावत बसण्याची गरजच नव्हती. काही नव्हतंच कोणाकडे. कमीपणा तरी मग कशाच्या बाबतीत बाळगावा?
 छान वाटत होतं. गरिबीतपण आनंद वाटत होता. 
पण मुंबईला शिकायला गेलो. आणि पहिल्यांदा गरिबीची जाणीव झाली. पण कोणाबद्दल मत्सर वाटला नाही आणि स्वतर्‍च्या परिस्थितीचं दुख मानलं नाही. पहाटे साडेचारला उठायचो. योग करायचो, अभ्यासाला बसायचो. कॉलेज, काम, यूपीएससीचा अभ्यास अशीच दिनचर्या संपूर्ण कॉलेज काळात होती. हातातल्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट्स लिहित राहिलो असतो, आपल्या वाटय़ाला आलेल्या संघर्षाची दुर्‍खं कथा उगाळत राहिलो असतो तर इथवर पोहोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकंच कळत होतं आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता. 
वयाच्या 31व्या वर्षी मी कलेक्टर झालो आहे. कष्ट केले नसते, आयुष्यात आलेल्या छोटय़ा संधीचं बोट धरलं नसतं तर या वयात इतरांसारखी नोकरीच शोधत बसलो असतो. इथे पोहोचेर्पयत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षानं मला आज काय दिलं हे मी महत्त्वाचं मानतो. 
आज 31 व्या वर्षी माझ्याकडे काय नाही?
 जगण्याचे हरप्रकारचे अनुभव घेतले आहे. पोटाला पीळ पाडणारी भूक अनुभवली आहे. आणि हे सगळं अनुभवणारा राजेंद्र भारूड नावाचा भिल्लं समाजातला तरुण जेव्हा आयएएस ऑफिसर होतो, भिल्ल समाजातला पहिलाच कलेक्टर होतो तेव्हा मग आजूबाजूच्या लोकांना जाग येते. इथंही काहीतरी बदलतंय, घडतंय याची जाणीव होते. 
लढायचं ठरवलं तर काहीच अशक्य नसतं हे एवढं जरी माझ्या तरुण मित्रांनी या भिल्लाच्या पोराकडे पाहून ठरवलं तरी खूप आहे.


 *( जिल्हाधिकारी, नंदुरबार)* 
( मुलाखत आणि शब्दांकन- माधुरी पेठकर)

Kargil vijay din

https://www.facebook.com/100002354191172/posts/3192441147510994/?sfnsn=wiwspmo&extid=W9Ao3uIMkITXx3Ld&d=n&vh=i

कारगिल विजय दिवस

https://www.facebook.com/ddsahyadri/videos/2515723325384929/?sfnsn=wiwspmo&extid=RheozANkC9irmdlP&d=n&vh=e

कारगिल विजयी दिन


via IFTTT

PM NARENDRA MODIJI

https://www.youtube.com/c/NarendraModi

Mann ki baat

https://youtu.be/EU6CfwqqEqk

Yog karo tandurust raho


via IFTTT

कारगिल विजय दिवस

Thursday, 23 July 2020

Quick heal antivirus चे निर्माता

*दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली*

Story of Quick Heal Antivirus's Birth

नाव कैलास काटकर. गाव मूळच सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.

कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला मराठी मिडीयम शाळेत घातलेलं.  पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसबस रडत खडत दहावी पर्यंत पोहचला. पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.

तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता.काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.

एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली, एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती. कैलासने आयुष्यात कधी  कॅलक्युलेटर बघितलासुद्धा नव्हता. त्याने तरी अप्लाय केले. नशिबाने मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फसेट मशिन अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.

किती जरी झालं तर खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल?

नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचा दुरूस्तीच दुकानं सुरु केलं.  सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, कोणी तरी सांगितलं,

” याला कॉम्प्युटर म्हणतात. आता येणार युग कॉम्प्यूटरचं असणार आहे.”

कैलाश विचारात पडला. येणार युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.

नव्वदच्या दशकातला तो काळ. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यान आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे. कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.

एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं  ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले. 

टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर  कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाच बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.

स्वतःच शिक्षण अर्धवट सुटल पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेजकरून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषध यालाच म्हणतात अँटी व्हायरस.

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे.त्यांच्या धाकट्या भावाने संजयने सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.

त्याच वेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं

*क्विक हील.*

*साल होत १९९५.*

संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला,पकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्याच्या दारोदारी फिरून आपल प्रोडक्ट खपवू लागले. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असण किती गरजेचे आहे हे पटवून संगे पर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विक हिल अँटी व्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.

अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली. *मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.*

*आज क्विकहिल हे भारतीय आहे, पुण्यात तयार झालंय यावर कोण विश्वास ठेवणार नाही.*

तिथ तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस उघडलेले आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवेल दिसेल. *आणि हे सगळ साम्राज्य उभ केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलान.*

*👉विशेष माहिती :* हा उद्योजक मराठी माध्यमातून शिकला होता. हे आजकालच्या पालकांनी लक्षात घ्यावे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Saturday, 18 July 2020

जिओ ग्लास

*🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक 🖥️*
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐
  📲 *_TECHNO GURU_*
◑ ━━━━━ ▣ ━━━━━ ◐

*जिओ ग्लासची एंट्री : रिलायन्सची थ्रीडी व्हर्च्युअल क्लासरूम*

       रिलायन्सच्या जिओने मिक्स्ड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित असणारे जिओ ग्लास हे स्मार्ट ग्लास बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.

रिलायन्सची आज ४३ वी सर्वसाधारण बैठक व्हर्च्युअल या प्रकारात आयोजित करण्यात आली. यात कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केला. यात जिओ ग्लास हे नवीन उपकरण बाजारपेठेत सादर करण्यात येणार असल्याची घोषणा लक्षवेधी ठरली. जिओ ग्लास हा संमीश्र सत्यता म्हणजेच मिक्स्ड रिअ‍ॅलिटी या तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात वास्तव आणि आभास याचा बेमालूम मिलाफ करण्यात आलेला आहे.

       जिओ ग्लास हे फक्त ७५ ग्रॅम वजनाचे आहेत. याच्या मदतीने कुणीही त्रिमीती म्हणजेच थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नसणार्‍या ठिकाणी असल्याची अनुभूती घेऊ शकतो. याच्या सोबत एक वायर देण्यात आली असून याच्या मदतीने या गॉगलला स्मार्टफोन अटॅच करता येतो. सध्या जिओ ग्लासवर २५ अ‍ॅप्सचा सपोर्ट दिलेला असला तरी ही संख्या लवकरच वाढविण्यात येणार आहे. याच्या मदतीने थ्रीडी तसेच होलोग्राफीक तंत्रज्ञानांवर आधारित सेवांचा वापर करता येणार आहे. याचा सर्वात जास्त वापर हा शिक्षण क्षेत्रात होऊ शकतो. सध्या कोरोनाच्या आपत्तीमुळे लॉकडाऊन सुरू असून बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करावा लागत आहे. यासाठी झूमसह अन्य अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर करण्यात येत असला तरी याला अनेक मर्यादा असल्याचे स्पष्ट झालेले आहे. नेमक्या याच ठिकाणी जिओ ग्लास उपयोगात येणार आहे. याच्या मदतीने कुणीही विद्यार्थी हा क्लासमध्ये नसतांना वर्गातच असल्याचा फिल घेऊ शकतो.

      या माध्यमातून रिलायन्स जिओने थ्रीडी व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यात विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम हा अतिशय मनोरंजक आणि इमर्सिव्ह या पध्दतीत शिकता येणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या वर्गात ताजमहालासारख्या ठिकाणाची माहिती दिली जात असतांना विद्यार्थ्यांना ताजमहालाची अगदी खरीखुरी वाटणारी आभासी सैर देखील घडविता येणार आहे. यात थ्रीडी आणि होलोग्राफीचा वापर केला असल्याने हे उपकरण अन्य क्षेत्रांमध्येही उपयुक्त ठरू शकते. सध्या तरी याचे मूल्य जाहीर करण्यात आले नसले तरी ते किफायतशीर असेल असा अंदाज आहे.

जिओ ग्लासच्या मदतीने थ्रीडी अवतार तयार करून याच्याशी इंटरअ‍ॅक्ट करता येणार आहे. यात दोन अवतार एकमेकांशी संवाद साधू शकणार आहेत. तसेच यात अतिशय दर्जेदार ध्वनीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ग्लासच्या मदतीने युजर संलग्न असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल देखील करू शकणार आहे. यात होलोग्राफीक कॉलींगचाही समावेश असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.
⊱⋅ ──────────── ⋅⊰
🇲 🇹 🇸   🇲 🇹 🇸  🇲 🇹 🇸
📡📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

Sunday, 12 July 2020

Santosh kendre sir

Diecpd nanded

Be Alert

Be alert

नीओवाईस C/2020 F3

🔮 *मित्रांनो सध्या आकाशात एक पाहुणा आपल्या भेटीला खूप दुरून आलाय आणि काही दिवस आपल्या भेटून तो पुढील प्रवासाला निघून जाणार आहे. कोण आहे हा पाहुणा ? 🤔*

मित्रानो हा पाहुणा आहे  *'नीओवाईस' (C/2020 F3) नावाचा धूमकेतू.* ☄️

याचा शोध 27 मार्च 2020 रोजी लागला. *Neowise* हा धुमकेतु *'Wide-field Infrared Survey Explorer'* या अंतराळात असलेल्या दुर्बिणीतून 🔭 दिसला. तो आपल्या सूर्याकडे 🌞 जवळ आला असून तो सर्वाधिक जवळ 3 जुलैला होता. आणि येत्या 23 जुलैला पृथ्वीच्या 🌎 सगळ्यात जवळून जाणार आहे. याचा सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी हा अंदाजे 4500 ते 6800 वर्ष इतका असून त्याची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार असते. आपल्याकडे तो पहाटे पूर्वेकडे क्षितिजावर सध्या दिसतो. दुर्बिणीने किंवा उघड्या डोळ्यांनी दिसतो. साधारणपणे 15 जुलैनंतर तो सूर्यास्तानंतर देखील उत्तर पूर्वेला क्षितिजावर 10 अंशावर दिसू शकेल. आणि हळूहळू दिवसेंदिवस वर सरकू लागेल. हा धूमकेतू विषुववृत्ताच्या उत्तरेकडील लोकांना दिसू शकेल. हा धूमकेतू ऑगस्ट महिन्यापर्यंत दिसू शकेल. आकाशात ढग ☁️ किंवा दाट धुके असेल तर तो दिसण्यास अडचणी येऊ शकतील.

धूमकेतू हा बर्फ, धुळीचे कण आणि गोठलेले वायू यांच्यापासून तयार झालेला एक गोळा असतो. धुमकेतूंना स्वतःचा प्रकाश नसतो. तो जेव्हा सूर्याच्या जवळ येतो तेंव्हा त्याच्यातील वायू आणि पाण्याची वाफ होऊन सूर्याच्या विरुद्ध दिशेला फेकले जातात. त्यामुळे त्याचा आकार लांबट दिसायला लागतो. त्याला धूमकेतूची शेंडी किंवा शेपटी पण म्हटले जाते. तो आकार साधारण झाडू सारखा दिसतो. ह्या शेपटीची दिशा ही सूर्याच्या नेहमी विरुद्ध बाजूला असते. आपल्याकडे याला पूर्वी शेंडे नक्षत्र असे देखील म्हणत असत.

असे म्हटले जाते की आपल्या ग्रहावर जे पाणी आहे ते कदाचित धुमकेतूंनी आणले असेल. काही शात्रज्ञाच्या मते पृथ्वीवर जीवसृष्टीची पेरणी सुद्धा धुमकेतूंनीच केली असावी. तर असा हा पाहुणा आला आहे आपल्या भेटीला त्याला दुरूनच निरोप देऊयात आणि अंतराळात घडत असणारे हे नाट्य आपण स्वतः डोळ्यांनी 👀 बघण्याचा आनंद नक्की घ्या.https://deepakdambalekwt.blogspot.com/?m=1

प्रा.जयंत नारळीकर live

https://youtu.be/ylLYeSakfc8

Saturday, 11 July 2020

LOCKDOWN

Steam

श्वास नलिका आणि अन्न नलिका ह्या दोन वेगळ्या आहेत.  आपण जर नेहमी गरम पाणी पिऊन घश्याची, अन्ननलिकेची सुरक्षा बघत असाल तर खूपच चांगलं आहे, व ती होतही असते.  पण श्वसन मार्गाचे काय ?  अजून एक पॅरानेझल सायनस म्हणून नाकाच्या पाठीमागेएक हाड असते, त्याच्या मागे एक पोकळी असते, त्या पोकळीमध्ये संसर्गाचे जंतू जाऊन बसतात. तिथे एक प्रकारचं लॉकिंग मेकॅनिझम असते त्यामुळे बाहेरील जंतू जाऊन प्राथमिकतः तिथे अडकतात.  परंतु तिथून ते चार दिवसांनी ते फुप्पुसांपर्यंत पोहोचतात.  सुरवातीला तिथल्या जंतूंच्या वास्तव्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत नाही, परंतु तिथून ते चार दिवसांनी ते फुप्पुसां पर्यंत पोहोचतात.  आणि नंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो.  जर त्या जंतूंना पॅरानेझल सायनस मध्येच मारायचं असेल तर स्टीम घेणे अती आवश्यक.  आपण जे गरम पाणी पितो ते तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. 
साधारणपणे ४० डिग्री सेन्टीग्रेड ची वाफ हि त्या व्हायरसला पांगळा करते. ६० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ ही व्हायरस ला पांगळी करते, आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याला मारू शकते. ७० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ हि व्हायरसला पूर्ण पणे मारते.  संपूर्ण चीन, जपान, हॉंगकॉंग, हा स्टीम वर आहे. आपल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे माहित आहे. कारण ते सुद्धा स्टीमच घेतात.
श्वास नलिकेतून संसर्ग थेट फुप्पुसांपर्यंत पोहचतो, म्हणून स्टीम घेणे कायम फायदेशीर आहे. 
आता ती कशी घ्यायची ?  जर घरातच असाल तर एकदा वाफ घ्यायची.  जर तुम्ही भाजी किंवा काहीही खरेदी करायला बाहेर जात असाल तर दोनदा वाफ घ्यायची.  जर तुम्ही लोकांना ऑफिस मध्ये भेटत असाल तर तीनदा घ्यायची.  जर कोण थेट कोविड रुग्णाची काळजी घेत असेल संपर्कात असेल तर दर दोन तासांनी वाफ घेणे अती आवश्यक आहे.  तर आता आपणच आपली काळजी घ्यायची आहे. 
म्हणजेच गरम पाणी पिणे, नियमित वाफ घेणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं जेवण जेवणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे ह्या गोष्टी काटेकोर पणे पाळलात तर आपण सुरक्षित राहाल.
कृपया वाचा आणि आपल्या ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.

Wednesday, 8 July 2020

Zee news

https://www.youtube.com/c/zeenews

इम्युनिटी DNA

https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtS_hh_VcP_a90mEwu5Sl40

टिलीमिली

दूरदर्शन

सप्रेम नमस्कार                                                                                                                                                                                     विषय: पहिली ते आठवी इयत्तांच्या अभ्यासक्रमावर ‘दूरदर्शन’ महामालिका - “टिलीमिली” २० जुलै २०२० पासून ‘सह्याद्री’ वाहिनीवर – दीड कोटी विद्यार्थ्यांना लाभ.

कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे कधी व कशा सुरू होऊ शकतील यासंबंधी अनिश्चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

अशा अपवादात्मक परिस्थितीत ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन’ या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरविले आहे. या उपक्रमात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या ‘ग्राममंगल’ व इतर नामांकित संस्थांचा व तज्ज्ञांचा सक्रीय सहभाग आहे. 
या मालिकेचे नाव शालेय विद्यार्थ्यांना आवडावे यादृष्टीने “टिलीमिली” असे ठेवण्यात आले आहे. राज्यात सर्वदूर राहणाऱ्या सुमारे दीड कोटी ‘टिलींना व मिलींना’ अर्थात मुलामुलींना त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर या नि:शुल्क सेवेचा रोज लाभ घेता येईल. ही मालिका त्यांच्या पालकांनीही मुलांसोबत जरूर बघावी व त्यात सुचवलेले उपक्रम त्याच दिवशी मुलांबरोबर घरी व परिसरात करून शिकावे.
“टिलीमिली” मालिका ‘बालभारती’च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित असेल. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील. मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जतील, त्यांच्याभोवती छोट्या-छोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाईल, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असेल व चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असेल. असे केल्याने मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल. अशी सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना ही मालिका रोज स्वत: शिकण्याची स्फूर्ती देईल, त्यांचा आत्मविश्वास वाढवेल व शिकायचे कसे हे शिकवेल.
जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही व अभ्यासू मावशी व काका स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात व आपल्या कॉलनीतल्या, वाडीतल्या, वस्तीतल्या किंवा शेजारच्या एकेक दोन-दोन मुलांच्या गटांना  ज्ञानरचना करायला रोज आपल्या घरी कशी मदत करू शकतात हेही “टिलीमिली” मालिका जाताजाता दाखवत राहील. त्यामुळे अनेक ठिकाणी ‘वाडीवस्ती-शिक्षण’, ‘कॉलनी-शिक्षण’ किंवा ‘मोहल्ला-तालिम’ देणारे ‘ज्ञानरचना सुलभक’ राज्यात पुढे यावेत अशी अपेक्षा आहे.  
रोज प्रत्येक इयत्तेचा एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे ६० पाठ ६० दिवसात ६० एपिसोड्समध्ये सादर केले जातील. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शनिवार असे ६ दिवस हे एपिसोड्स सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येतील. त्यामुळे “टिलीमिली” मालिका सलग दहा आठवडे प्रसारित केली जाईल. 
आठही इयत्तांचे मिळून ४८० एपिसोड्स असलेली ही महामालिका सोमवार, दिनांक २० जुलै २०२० रोजी सुरू होईल व शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी समाप्त होईल. 
सामान्यत: कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे मुख्य माध्यम असल्याने मराठी माध्यमाव्यतिरिक्त पण मराठी समजणाऱ्या इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल. 
दिनांक २० जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या काळातील इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:           
वेळ                           इयत्ता
सकाळी ७.३० ते ८.०० - आठवी
सकाळी ८.०० ते ८.३० - सातवी 
सकाळी ८.३० ते ९.०० - DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ९.०० ते ९.३० -सहावी
सकाळी ९.३० ते १०.०० - पाचवी
सकाळी १०.०० ते १०.३० - चौथी
सकाळी १०.३० ते ११  - तिसरी
सकाळी ११.०० ते ११.३० - DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ११.३० ते दुपारी १२ - दुसरी
दुपारी १२ ते १२.३०  - पहिली

‘सह्याद्री’ दूरदर्शनवरील ही महामालिका टाटा स्काय वर १२९९, एअरटेल वर ५४८, डिश टीवी वर १२२९, व्हिडिओकॉन d2h वर ७६९, डीडी फ्रीडिश वर ५२५ आणि हाथवे वर ५१३ या क्रमांकांच्या चॅनल्सवर बघता येईल.

जनता कर्फ्यु किनवट

गुरू पोर्णिमा


via IFTTT

सुख दो सुख लो


via IFTTT

Monday, 6 July 2020

Nitinji bangude

https://www.facebook.com/welovemarathi/videos/1435263966672529/

प्रतिज्ञा

गुरू पोर्णिमा


मनसब योग साधना केंद्र किनवट
गुरू पोर्णिमा उत्सव 6/7/20 (4.00 pm)
आपले सहर्ष स्वागत
किनवट भूषण आदरनिय योगगुरुआखिलखान सर आपल्या सर्वांना योग व सर्व आसने या बद्दल  अनेक वर्षा पासून सवीस्तर मार्गदर्शन देत आहेत या कोरोना काळात ही त्यांनी खंड पडू दिला नाही त्यांनी फेसबुक लाइव वरुन दररोज 7.00 ते7.45
ला सवीस्तर योग आणि सर्व आसने सवीस्तर करुन दाखवून सखोल मार्गदर्शन केले सम्पुर्ण किनवट, व सर्व नांदेड  जिल्हा रहिवासी तर्फे आखिलखान सरांचे आभार व्यक्त करतो यानंतर ही त्यांचे मार्गदर्शन राहिल अशी आशा व्यक्त करतो 
आखिलखान सरांचे lockdown काळातील सर्व  live vedeo माझ्या blog वर  save आहेत ते कधिही पाहू शकता या गुरू पोर्णिमा पासुन योग यावर  नवीन  blog तयार केला आहे यानंतर चे video  त्यात save केले जातील  ते कधिही पाहु शकता link खाली देत आहो
https://manasabyog.blogspot.com/

Aakhilkhansir

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2644401165798505&id=100006859424736&sfnsn=wiwspmo&extid=cSYcIaIAZiIdNp6A&d=n&vh=i

Sunday, 5 July 2020

Educational jio tv

आज दि.०५ जुलै २०२० रोजी राज्यातील इ.१० वी मराठी माध्यम, इ.१० वी इंग्रजी माध्यम व इ.१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी जिओ टी.व्ही.वर स्वतंत्र ३ ज्ञानगंगा शैक्षणिक चॅनेलचे उद्घाटन मा.वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण यांच्या हस्ते करण्यात आले.
जिओ टी.व्ही वरील हे चॅनल पाहण्यासाठी 
• JIO TV पाहण्यासाठी JIO मोबाइल क्रमांक व इंटरनेट सुविधा आवश्यक 
• Playstore अथवा MY JIO app वरून Jio TV हे app डाऊनलोड करावे.
• सदर app वर Login करण्यासाठी आपला jio मोबाइल क्रमांक व आलेला OTP टाकावा 
• “Categories” या Option मधून  “Educational(६५)” हा Option निवडावा 
• Scroll करीत आल्यास  ज्ञानगंगा १०वी मराठी, ज्ञानगंगा १० वी ENGLISH, ज्ञानगंगा १२वी SCIENCE हे channel निवडावेत.
जिओ सावन वरील रेडीओ कार्यक्रम ऐकण्यासाठी 
• JIOSaavn  रेडीओ ऐकण्यासाठी स्मार्ट फोन  व इंटरनेट सुविधा आवश्यक 
• Playstore वरून JIOSaavn app डाऊनलोड करावे.
• Podcast मधून महावाणी (Mahavani) हा ऑप्शन निवडावा तिथे आपणास रेडीओ ऐकण्यास उपलब्ध असेल. 

-

दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 

*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐💐*

Guru

Aakhilkhansir

https://m.facebook.com/watchparty/2460070990898807/

Saturday, 4 July 2020

मनसब योग किनवट

Gurupornima


via IFTTT

गुरू पोर्णिमा

Oxygen park wardha

https://www.facebook.com/satyapal.maharaj/videos/325004775193759/

Jio tv 10 वी अभ्यास

*Jio TV च्या माध्यमातून कशा प्रकारे इ.10 वीचा अभ्यास करता येईल याची माहीती खालील प्रमाणे.*

*1) सर्व प्रथम Jio TV App डाउनलोड करणे.*

*2) App ओपन करून त्यामध्ये categorie सलेक्ट करणे*

*3) Categorie मध्ये गेल्यानंतर Educational (64) सलेक्ट करणे.*

*4) त्यानंतर categorie च्या बाजूलाच language सलेक्ट करणे.*

*5) language मध्ये गेल्यानंतर आपले माध्यम निवडणे (मराठी किंवा इंग्रजी माध्यम)*

*6) खाली लगेच इयत्ता 10 वी चे ऑनलाईन तासिका तुम्हाला पाहता येईल.*

*7) जर तुम्हाला अगोदर झालेल्या तासिका पहावयाच्या असतील तर categorie च्या बाजूला Yesterday वर सलेक्ट करा तुम्हाला अगोदरच्या तासिका पाहता येईल.*
 
अशाप्रकारे इयत्ता 10 वी चा अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्यांना देणे सोयीस्कर होईल. 

*धन्यवाद.*🙏🙏🙏

Aakhilkhansir

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2642630835975538&id=100006859424736&sfnsn=wiwspmo&extid=b5Jyq58grhA5q9B1&d=n&vh=i

P M


via IFTTT

Thursday, 2 July 2020

वंदे मातरम


via IFTTT

वंदे मातरम

https://www.facebook.com/groups/majhi.amravati/permalink/3113800348742165/?sfnsn=wiwspmo&extid=0iQugzn8NOevSmCh&d=n&vh=e

Yog karo Raho mast

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3037593882996680&id=100002382932726&sfnsn=wiwspmo&extid=WHJyqQjTqDy0vkog

Google

https://www.inmarathi.com/4225/the-indian-man-behind-google-foundation/

मनसब योग

मनसब योग केंद्र किनवट                                               ध्यान,मेडिटेशन,                                                        अनिद्रा, BP(low/hi).बेचैनि है तो सभी Facebook  live इस सोमवार से रात्री 10 से 10.30 आवश्य देखीये       योग गुरु आदरनिय आखिलखान सर  द्वारा

दूरदर्शन

*उद्या पासून दूरदर्शनवर सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी,या चॅनलवर १ ली ते १२ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमा वर कार्यक्रम होणार आहे.*

*वेळ खालीलप्रमाणे:*
*१०:३० ते ११.०० -पहिली ते पाचवी,*
*११.०० ते १२.०० -६ वी ते ९ वी व ११वी,*
*१.०० ते २.००  - १० वी व १२ वी*     

*हा मेसेज शालेय विद्यार्थ्यांना पाठवा.ईयत्ता १ली ते १२ पर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत.जी हवी ती डाऊनलोड करा.आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्याकडे असेल तर त्यांना ही लिंक पाठवा...मुले नक्कीच अभ्यास करतील...*
*एक उत्तम पालक म्हणुन आपले कर्तव्य पार पाडा.*
*आपल्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे.*
*लिंक खाली दिली आहे,*
*धन्यवाद.*

*http://cart.ebalbharati*
*.in/BalBooks/ebook.aspx*


*सर्वानी पुढे पाठवा* 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Aakhilkhansir

https://m.facebook.com/watchparty/883987808751575/

Wednesday, 1 July 2020

Vitthal darshan live

https://apigw.jio.ril.com/hlsplayer/?w=676&h=380&url=https://rcpems02.jio.ril.com/videofeed.cdn.ril.com/LordShri_Vitthal/LordShri_Vitthal_400.m3u8?cdt=xfctPaVzwnj1-V2VZ6Nrtg&exp=1590000000

माउली

https://m.facebook.com/watchparty/261890878432574/

धूमकेतू Dhumketu 2025