Youtube

Youtube
Chanel

Thursday, 4 June 2020

Corona

*पूर्णपणे वाचून समजून झालं की लोकांना फॉरवर्ड करा.*
*Forward  ONLY AFTER YOU READ AND UNDERSTOOD*

*कोरोना* रोग लवकर नष्ट होईल असे वाटत नाही ,तथापी आपल्याला काम हे *करावेच* लागणार आहे .
दैनंदिन जीवनामध्ये  आपला रोज अनेक लोकांशी संपर्क येतो त्यामुळे यापुढे किमान १ वर्ष खालीलप्रमाणे *काळजी* घेणे अत्यंत आवश्यक झालेले आहे .

🌍 जितका वेळ शक्य असेल तितका वेळ सार्वजनिक शौचालये वापरु नयेत.

🌍 आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या चपला बूट बाहेर काढण्यास सांगावे .

🐡ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सॅनिटायझर ने हात स्वच्छ करण्यास सांगावे .

🐡चलनी नोटा न हाताळता आपल्याला येणे असलेली रक्कम चेकने अथवा ई पेमेंटने स्वीकारावी .
🐡 आपले मित्र  तसेच नातरवाईक व सहकारी यांचे दरम्यान 4 फूट  अंतर कायमस्वरूपी राखावे .

🐡 कागदपत्रे हाताळताना, वाचताना, पान पलटताना थुंकी लावू नये .

🐡 अगदी गरजेच्या वेळेस ऑफिसमध्ये अथवा पार्किंग मध्ये  उपस्थित राहून भेटावे 

🐡 अनेक क्लायंट वा मित्र यांना फोन जोडून देऊन या फोनवर बोला असे म्हणायची सवय असते शक्यतो असा प्रकार अजिबात करू नये फक्त *स्वतःचाच* मोबाईल फोन वापरावा .

🐡 आपल्याला भेट देणाऱ्या व्यक्तीने *मास्क* घातला नसेल तर त्याच्याशी संभाषण करण्यास *स्पष्ट* नकार द्यावा .

🌍 अनेक वेळा गडबडीत आपण थुंकी लावून नोटा मोजतो ते पूर्णपणे टाळावे, रस्त्यावर थुंकु अगर पिंचकारी मारू नका .

🐡 काम संपल्यानंतर लवकरात लवकर आपल्या घरी जावे व हातपाय धुवावे कपडे धुण्यास टाकावे वा स्वत: धुवावेत.

🌍कोणाशीही भेट घेऊ नका व कोणालाही भेटु नका.

🐡अगदी जवळच्या कुटुंबाचीही भेट घेऊ नका.

🌍 अगदी बाजूच्या शेजाऱ्याचीही भेट घेऊ नका.

🐡 बिल्डिंग च्या कॉमन ग्यालरीत मध्ये सहज देखील जमा होऊ नका.

🌍 बिना मास्क कॉमन ग्यालरीत येऊ नका.

🐡बिल्डिंग ची कॉमन मीटिंग आयोजित करू नका.

🌍 अगदी बिल्डिंग मधील ग्यालरी व जिने पाण्याने धुण्यासाठीही एकत्र येऊ नका, *( सध्या बिल्डिंगची ग्यालरी व जिने पाण्याने धुण्याचे फ्याड कित्येकदा जनजागृती करूनही काही बिल्डिंग मध्ये अजूनही पाहायला मिळतंय, बाबांनो आपल्या कुटुंबियांना विशेषतः महिला वर्गाला सतर्क करा की पाण्याने ग्यालरी व जिने धुवून कोरोना जाणार नाही उलट तो तुमच्या घरात तुमच्या ओल्या पायाने, ओल्या हाताने, वापरलेल्या झाडुतून, बिल्डिंग मध्ये जिने धुत असताना जो लोकसंपर्क आला त्यातून तो तुमच्या घरात प्रवेश करतो )*  कारण आपला शेजारीच जर उद्या कोरोना पेशंट निघाला तर त्याच्या संपर्कात आल्याने आपण आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव देखील धोक्यात घालत असतो.

🌍 रस्त्यावरील खाद्यपदार्थ,कापलेली फळे खाणे कायमस्वरूपी टाळावेत. घरातील भाजीपाला,फळे मीठाच्या पाण्यात १/२ तास भिजत ठेवावा.

🐡 जुनी कागदपत्रे हाताळताना हॅण्डग्लोव्हज वापरा जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

🌍 परगांवा वरून येणाऱ्या  लोकांची मित्रांची सहकार्याची नातेवाईक यांची  संपूर्ण माहिती फोनवरून घ्यावी व तो आला असेल अंतर ठेवावे .

🐡 शासनाकडून गेले २महिना ज्या सूचना सुरू आहेत जसे साबणाने हात धुणे या सूचनांचा अंमल कायमपणे सुरू ठेवावा .

🌍 *शेकहॅण्ड* पूर्णपणे टाळावेत व आपली परंपरागत नमस्काराची पद्धत अवलंब करावी .

🐡 लॉक डाउन *संपले वा शिथील केले* याचा अर्थ रोग *तो विषाणू नष्ट* झाला असा घेऊ नये .

🌍 कोरोना झाला तर आपण बरे होऊ शकतो ,तथापि *आजारी* न पडणे हा उत्तम उपाय आहे .

🐡 मला काय होतंय,मी ठणठणीत आहे ,माझी इम्युनिटी खूप चांगली आहे , मी आजारी पडू शकत नाही अशा अविर्भावात राहू नये .

🌍 टू व्हीलरवरून प्रवास करताना पाठीमागील व्यक्तीला कानाजवळ येऊन बोलण्याची सवय असते अशा व्यक्तींना टू व्हिलरवर पाठीमागे बसवून घेऊन जाऊ नये, चार चाकी वाहनातून एकट्याने प्रवास करावा दोघांच्या सुरक्षिततेसाठी चालक टाळावा.

🐡 फोन,मेसेजेस, व्हॉट्सॲप ,ई मेल या साधनांचा संभाषणासाठी जास्तीत जास्त वापर करावा .

🌍 निदान यापुढे १वर्षे पुणे ,मुंबई येथील  कामे ( प्रवास करून करावी लागणारी सर्व कामे )शक्यतो टाळावीत, किंवा ई फायलिंग व व्हिसीचा वापर करावा 

🐡 गेल्या २ महिन्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट समजली आहे की,*जगण्यासाठी* खूप कमी पैसे लागतात जे पैसे जादा लागतात ते पैसे जगण्यासाठी लागत नसून *वागण्यासाठी* लागतात हे लक्षात ठेवावे .

🌍 पेट्रोल डिझेल यासाठी वारंवार पंपावर जाणे टाळावे,शक्य असेल त्यावेळी जास्तीत जास्त इंधन भरून घ्यावे .

🐡 घरातील लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांचेकडे विशेष लक्ष द्यावे .

🌍  जत्रा,यात्रा व जेवण,रस्सा पार्टी  यासारखे कार्यक्रम शक्यतो १ वर्ष पुढेच ढकलावेत .

आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत ही भावना कायम जागृत ठेवावी.

🌲🌲पर्यावरण स्वच्छ झाले असले तरी आपल्याला कोरोना विषाणूंचे सायलेंट कॅरिअर दिसून येणार नाहीत !!

*पूर्णपणे वाचून समजून झालं की लोकांना फॉरवर्ड करा.*
*Forward to each and every person*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025