राजवैभव थोर असेल ; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे...
छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून मान्यता पावलेले थोर राजे जातीय विषमतेविरुद्ध आणि उच्च नीचतेविरुद्ध बंड पुकारुन सामाजिक समता स्थापन करणारा रयतेचा राजा अशी त्यांची ओळख. छ्त्रपती शाहूमहाराज यांनी जातिभेदाशी अखेपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह, विधवापुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध यांना त्यांनी कायदेशीर मान्यता दिली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनिष्ट प्रथांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
माणसातील राजा आणि राजातील माणुस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन...💐🙏
No comments:
Post a Comment