Youtube

Youtube
Chanel

Saturday, 16 May 2020

शुन्य सावली दिवस

🌑 *महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस*
●●●●●●●●●●●●●●●
शून्य सावली दिवस हा शब्द च कुतूहल निर्माण करणारा आहे कारण ह्या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते.तो क्षण आनी दिवस केव्हा आणि कुठे घडतो हे आपण खालील माहिती द्वारे जाणून घेणार आहोत.......
     सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या  23.50 ° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात.उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा.तसेच सूर्य दर रोज 0.50 ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.
       भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो.पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथपर्यंत २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.
     महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात.कोल्हापूर जिल्ह्यातील  सावंतवाडी येथे  ३ मे रोजी तर  धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो.भारतातून शेवटी  मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० ° अंशावरून कर्कवृत गेले आहे,त्यामुळे शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे.भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली,हिमाचल,काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही.
   आता आपण महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस पाहूया--महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्यात २१.९८ ° अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत,त्यामुळे सर्व शहरे आनी गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे,त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ ह्या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे.समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल.
*साहित्य* दोन,तीन इंच व्यासाचा ,एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप,कोणतीही उभी वस्तू,मनुष्य उन्हात सरळ उभी ठेवावी.सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.
-----------------------------------
*तारीख* --- *महा..शहरे*
*३ मे*  --सावंतवाडी,      मांगेली,खूषगेवाडी
*४ मे*-मालवण,आंबोली
*५ मे*-देवगड,राधानगरी, रायचूर
*६ मे*-कोल्हापूर, इचलकरंजी,
*७ मे*-रत्नागिरी, सांगली, मिरज
*८ मे*-कऱ्हाड, जयगड, अफजलपूर
*९ मे*-चिपळूण, अक्कलकोट
*१० मे*-सातारा, पंढरपूर, सोलापूर
*११ मे*-महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाइ
*१२ मे*-बारामती, बार्शी, उस्मानाबाद
*१३ मे*-पुणे,मुळशी, दौड, लातूर,लवासा
*१४ मे*-लोणावळा, अलिबाग, दाभाडे,पिंप्री-चिंचवड, देहू,जामखेड, आंबेजोगाई,
*१५ मे*-मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड,माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा
*१६ मे*-बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर,नारायण गाव,खोडद,अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल
*१७ मे,*-नाला सोपारा, विरार,आसनगाव, अहेरी,आल्लापल्ली,
*१८ मे*-पालघर,कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा
*१९ मे* औरंगाबाद,डहाणू,नाशिक,कोपरगाव,वैजापूर, जालना, पुसद,बल्लारशा,चामोर्शी
*२० मे*- चंद्रपुर,मेहकर,वाशीम,वणी,मूल
*२१ मे*-मनमाड,चिखली, गडचिरोली,सिंदेवाही, रोहना,
*२२ मे*-मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी
*२३ मे*-खामगाव, अकोला , देसाईगंज, ब्रम्हपुरी,नागभीड
*२४ मे*-धुळे,जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड,दर्यापूर
*२५ मे*-जळगाव,भुसावळ, अमरावती,अंमळनेर,तेल्हारा
*२६ मे*-नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा
*२७ मे*-नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर,गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक
*२८ मे*- अक्कलकुआ,शहादा, पांढुरणा, वरुड,नरखेड,
*२९ मे*-बोराड, नर्मदा नगर,
*३० मे*- धाडगाव
*३१ मे*-तोरणमाळ
---------------------------https://www.youtube.com/user/deepakkinwat

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025