*आजचा वेबिनार*
आज दिनांक 9 मे 2020 च्या वेबिनार मधील काही *मा.आयुक्त विशाल सोळंकी साहेबांच्या* भाषणातील काही ठळक मुद्दे.
1)पुढील शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे. 2 ते 3 महिने आपल्याला कदाचित होम लर्निंग अभ्यास पूर्ण करून घ्यायचे आहे. दररोज 2 तासा पेक्षा अधिक काळ अभ्यास देऊ नये.
2)तंत्रस्नेही शिक्षक यांनी अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासक्रम तयार करावा.
3)लवकरच शैक्षणिक चॅनेल सुरू करणार किंवा दूरदर्शन व सह्यादी वाहिनीवरून अभ्यासक्रम पूर्ण करून घेणार.
4)पुढील वर्षात केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी भरती शक्य नाही त्यासाठी 2 ते केंद्र/बिट यांचा पदभार घ्यावा किंवा इतर मुख्याध्यापक/शिक्षक यांची मदत घ्यावी.व आवाहन पेलावे.
5)PGI मध्ये महाराष्ट्र देशात 802 गुणांसह पहिल्या 3 मध्ये आहे लवकरच पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र नक्की जाणार त्यासाठी सर्वांची मदत लागणार.
6)सरल व युडायस यांच्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. यासाठी दोन्ही एकत्र आणणार.
7)शालेय पोषण आहार वाटप सर्वाना व्यवस्थित वाटप केले भविष्यात देखील याप्रमाणे कार्य करावे.
8)आर्थीक संकट ओढवल्याने अनेक विद्यार्थी कुटुंबाला मदत म्हणून मजुरी करतील यासाठी नवीन उपाययोजना करून शाळाबाह्य कुणी राहणार नाही यासाठी सर्व मिळून उपाययोजना करणार आहोत.
9)विद्यार्थी आधार कार्ड 100% पूर्ण करून संचमान्यता करणार. 402 तालुक्याना आधार किट दिलेले आहे. त्यासाठी 804 टेक्निकल पर्सन नेमून कॅम्प लावून 100% आधार कार्ड पूर्ण करून घेणार
10)जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा यावर्षी प्रवेशोत्सव स्पेशल असणार आहे.
11) यावर्षी प्रायव्हेट शाळांची फी परवडू न शकल्याने आपल्याकडे पट वाढणार. त्यासाठी अर्थ विभागाकडे विंनती करून 1 ते 8 वर्गासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.
12)प्रायव्हेट शाळांना यावर्षी फी वाढ करू देणार नाही. फी साठी टप्पे पडणार.
13) लर्न फ्रॉम होम साठी *स्मार्ट कृती आराखडा* तयार करण्याचे काम सुरू. होम लर्निंग पॅकेज येणार.व्हाटस अँप व इतर गोष्टी त्यातून शिक्षक व्हाटस अप माहिती, पालक व्हाटस अप, सुविधा यांचे सर्वेक्षण केंद्रप्रमुख यांच्या मार्फत करून पुढील आराखडा तयार करणार.
14)साहेबांच जातांना सांगितलेले छान वाक्य *संकट मोठे आहे, पण संकटापेक्षा माणूस मोठा आहे* त्यासाठी आपण सर्व कार्य करणार आहोत.
🙏🙏
No comments:
Post a Comment