Sunday, 29 September 2019
Namadev beladar
भंगार बाजारातून ज्ञानरचनावादी खजिना साकारणारे गुरुजी.
शिक्षण आणि शिकविणे हे अनेकदा औपाचारिक पातळीवर राहते पण जेव्हा एखादा विषय किवा घटक मुले प्रत्यक्ष कृतीतून किवा विचारातून स्वतः कल्पकतेने जिज्ञासू वृत्तीने शिकतात व समजून घेतात तेव्हा ते त्यांच्या पचणी पडते व त्याची मेंदूत कायमची साठवण होते ..याचीच प्रचीती देणारे आमचे हसत खेळत आनंददायी शिक्षण ....हा ज्ञानरचनावादी आनंददायी शिक्षणाचा खजिना साकारला आहे भंगार बाजारातील टाकाऊ साहित्यातून.....
आदिवासी ,दूर्गम भागातील परिस्थिती तसेच ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन ,बहुवर्ग अध्यापनात येणाऱ्या समस्या दूर करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ,बौद्धिक ,व मानसिक विकास व्हावा तसेच ताणतणावरहित आनंददायी,कृतीशील शिक्षण मिळावे या उद्देशाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळुंजे येथील उपक्रमशील शिक्षक नामदेव बेलदार यांनी आदिवासी दुर्गम भागात बहुवर्ग व ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन करत असतांना येत असलेल्या समस्या डोळ्यासमोर ठेवून त्यावर उपाययोजना करतांना आपल्या संकल्पनेतून भंगार बाजारातील प्लायवूडवर साकारलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ अशा ज्ञानरचनावादी स्मार्ट बोर्ड या नवोपक्रमाची संकल्पना साकार केली. .भंगार बाजारातील टाकाऊ पलायवूड वर आकर्षक ज्ञानरचनावादी आरेखन तसेच विविध घटकांशी निगडीत प्रात्याक्षिके व खेळ कल्पकतेने साकारण्यात आले आहे . स्मार्ट बोर्ड निर्मितीसाठी कच्या स्वरूपातील भंगार बाजारात किलोप्रमाणे मिळणारे प्लेन व्हाईट प्लाय बोर्ड मिळविले. सदर प्लाय बोर्डवर आकर्षक असे लेखन ,वाचन तसेच प्रात्यक्षिक कार्यास वाव देणारे ज्ञानरचनावादी आरेखन करण्यात आले .त्याचबरोबर त्यासाठी लागणारे अतिरिक्त
पूरक साहित्यही टाकाऊ वस्तूंचा वापर करून तयार केले.प्रात्यक्षिक व कृतीतून भाषा ,गणित तसेच इंग्रजी या तीनह विषयांचे मुलभूत संबोध व संकल्पना स्पष्ट होण्यासाठी अर्थात स्वतः कृतीतून शिकण्यासाठी विविध प्रकारचे ज्ञानरचनावादी आरेखन बोर्डवर स्वतः कल्पकतेने केले.दोन्ही बाजूने बोर्डचा वापर करता येईल तसेच विद्यार्थ्यांस हे बोर्ड सहजरीत्या हाताळता येतील अशा पद्धतीने विविध ज्ञानरचनावादी स्मार्ट बोर्डची पूरक साहित्यासह स्वनिर्मिती केली.
उपक्रमाची यशस्विता –
१ ) विद्या प्राधिकरण पुणे यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम (शोधनिबंध ) स्पर्धेत
जिल्हास्तरावर प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
२ ) जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रकारात प्रथम क्रमांक व राज्यस्तरीय
विज्ञान प्रदर्शनासाठी निवड.
३ ) राज्यस्तरीय शिक्षण वारीसाठी निवड.पुणे ,नागपूर, औरंगाबाद येथे सहभाग व यशस्वीरीत्या
सादरीकरण.
४ ) जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कार्यशाळा व विविध शाळामध्ये उपक्रमाची अंमलबजावणी सुरु .
या शैक्षणिक प्रवासात उल्लेखनीय म्हणजे इन्स्पायर अवार्ड स्पर्धेत एका आदिवासी भागातील विद्यार्थी व शिक्षकाने आपल्या टाकाऊतून टिकावू स्वनिर्मित प्रकल्पाचा गल्ली ते दिल्ली असा प्रवास करत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारत तीन विभागातून राष्ट्रीय स्तरावर जाणारी एकमेव निवड झालेली शाळा असा नावलौकिक मिळविला..प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय शिक्षण वारीसाठी उपक्रमाची निवड झाली व पुणे,नागपूर व औरांगाबाद येथे आपल्या उपक्रमाचे सादरीकरण करण्याची सांधी मिळाली.शिक्षण परिषद पुणे यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या नवोपक्रम शोधनिबंध स्पर्धेत सादर केलेल्या नवोपक्रमास जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिकमिळाले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली .विविध ठिकाणी व विविध शाळांमध्ये मोफत योगशिबिरे राबविली आहेत.
विविध संस्था व दानशूर व्यक्ती यांचे मदतीने आजपर्यंत १५ लक्ष इतका मोठा समाज सहभाग शाळेने मिळवीला आहे.समाजसहभागातून शाळेतील दुरुस्ती,भौतिक सुविधा,डिजिटल शाळा अशी कामे केली आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग व हरितकुंभ उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला आहे. .दोन वेळा पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त नाशिक ते पंढरपूर सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे..शाळेमध्ये विविध पर्यावरण पूरक उपक्रमांची अंमलबजावणी व त्यातून पर्यावरण विषयक जाणीव जागृती केलीआहे.. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा व एक दिवस का होईना त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी दप्तरमुक्त शनिवार यां उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. अवयव दान चळवळीत सहभाग घेवून अवयव दान सांकल्प केला आहे.. लेक वाचवा लेक शिकवा ,स्रीभ्रूणहत्या,बालमजुरी यासारख्या विषयांवर आधारित विविध उपक्रम व पथनाट्यातून जनजागृतीसाठी प्रयत्न केले .विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. अब्दुल कलाम वाचन कट्ट्ट्याची स्थापना,शिक्षण महोत्सव,व्यसनमुक्ती पाडवा,बोलकी शाळा,बाहुलीनाट्य असे विविध उपक्रम राबविले आहेत.. टाकाऊ वृत्तपत्रांतील कात्रणे कापून विविध विषयांचा वैविध्यपूर्ण असे कात्रण संग्रह साकारले आहेत..अशा विविध शैक्षणिक उपक्रमांचे ,सामाजिक सांस्कृतिक कार्याचे फलित म्हणून सन २०१७/१८ यां वर्षी राज्य शासनाचा व जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक एकाच वेळी प्राप्त होण्याचा सन्मान मिळाला.
मागील पाच वर्षात केलेली उल्लेखनीय कामे (कामाचे स्वरूप,शाळा,कालावधीसह)
बोलकी सुंदर शाळा निर्मिती.शिक्षण महोत्सव उपक्रमातजिल्हास्तरावर,तालुकास्तरावर उल्लेखनीय सहभाग व शाळास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी.विविध शाळामध्ये विद्यार्थी शिक्षकांसाठी मोफत योगाशिबिरे व मार्गदर्शन.
इन्स्पायर अवार्ड स्पर्धेत जिल्हास्तर,राज्यस्तरावर यश व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होवून दिल्ली येथे उल्लेखनीय सहभाग.राष्ट्रीय स्पर्धेत जिल्ह्यातून निवड झालेल्या एकमेव जि.प.शाळा म्हणून बहुमान.
विज्ञान प्रदर्शनात तालुकास्तरावर,जिल्हास्तरावर सातत्याने सहभाग व यश.जि.प.तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग व यश.मनोरंजनातून शिक्षण अंतर्गत बाहुलीनाट्य उपक्रमाची शाळेत प्रभावीपणे अंमलबजावणी.
राज्यस्तरीय शिक्षण वारीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाची निवड.पुणे,नागपूर,औरंगाबाद येथे शिक्षणाच्या वारीतून सादरीकरण केले.
आदिवासी दुर्गम भागात ज्ञानरचनावादी अध्ययन अध्यापन करतांना येणाऱ्या समस्या तसेच बहुवर्ग अध्ययन अध्यापन करताना येणाऱ्या समस्या,पुरेशा वर्गखोल्यांचा अभाव यां समस्यांवर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने भंगार बाजारातील प्लायवूड वर स्वनिर्मितीतून साकारले ज्ञानरचनावादी स्मार्टबोर्ड. माझे ज्ञानरचनावादी स्मार्टबोर्ड यां स्वनिर्मित नवोपक्रमाची शाळास्तरावर,बीटस्तरावर,तालुकास्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी तसेच या नवोपक्रमाचे विविध स्पर्धा,प्रदर्शने यामध्ये उल्लेखनीय यश व राज्यस्तरापर्यंत निवड.
तालुक्यात व जिल्ह्यात उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक.स्वच्छ भारत,हरीतकुंभ अंतर्गत शाळास्तरावर विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी.
शैक्षणिक साहित्याचा वापर
स्वतः तयार केलेले साहित्य –
भंगार बाजारातील प्लायवूड पासून तयार केलेल्या (टाकाऊ पासून टिकाऊ) विविध ज्ञानरचनावादी स्मार्ट बोर्डचा स्वयंअध्ययन,अध्यापनात कौशल्याने वापर,बहुउपयोगी ज्ञानरचनावादी स्मार्ट कार्डसचा उपयोग,बहुउपयोगी म्याजिक बोर्डच्या वापरातून स्वयंअध्यन, वाक्यपट्ट्या,चला खेळ खेळूया,मासे पकडूया,जादूची कांडी,म्हणी तयार करुया,अर्धे तुझे अर्धे माझे,रिंगमास्टर,गन फन अशा विविध शैक्षणिक आनंददायी खेळांची निर्मिती व वापर तसेच डब्या,बाटल्या,मनी अशा विविध वस्तूंचा वापर करून ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य निर्मिती. मनोरंजनातून शिक्षणासाठी विविध प्रकारच्या बोलक्या बाहुल्यांची निर्मिती व अध्ययन अध्यापनात वापर.आंतरेन्द्रीय मानवी प्रतिकृती,वाचन एक्स्प्रेस,आपली सूर्यमाला इ.
विविध प्रकारचे विविध विषयांशी निगडीत कात्रण संग्रह,बोधकथा संग्रह,शब्दकार्डस,वाक्यकार्ड्स,अंक व संख्याकार्ड्स,भौमितिक आकृत्या ,चित्र संग्रह,मणी माळ,दशक शतक प्रतीके,मापन प्रतीके इ.
शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर –
दृक्श्राव्य साधणे- प्रोजेक्टर,संगणक,LED TV या माध्यमातून ई लर्निग. अध्ययन अध्यापनात वापर.TAB व ANDROID मोबाईलच्या माध्यमातून विविध भाषा,गणित,इंग्रजी व कला
विषयक शैक्षणिक APP चा वापर.
TAB व ANDROID मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेट माध्यमातून तंत्रस्नेही शिक्षण. साऊंड सिस्टीमचा संगीतमय पाढे,संगीतमय परिपाठ,तसेच संगीतमय कविता,गाणी,नाट्य,अभिनय,संवाद यासाठी प्रभावीपणे नियमित वापर.
विद्यार्थ्यामध्ये विविध विषयाची आवड निर्माण व्हावी,त्यांच्यातील सृजनशीलता ,चिकित्सकपणा,शोधकवृत्ती,अभिव्यक्ती वाढावी,अध्ययनाचा दैनंदिन व्यवहारात वापर करता यावा यासाठी केलेले विशेष प्रयत्न व राबविलेले उपक्रम -
विद्यार्थ्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा त्याना विविध विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी दप्तरमुक्त शनिवार हा नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविला जातो.यां दिवशी शाळेत विविध कलागुणांना वाव देणारे उपक्रम घेतले जातात.(आमचा दप्तरमुक्त शनिवार youtube ..namdev beldar)
विविध जयंती पुण्यतिथी यातून संवाद व नाट्यीकरण.सहशालेय उपक्रमां अंतर्गत परिसर क्षेत्रभेट,वनभोजन,सहली यातून प्रत्यक्ष ऐतिहासिक,भौगोलिक ज्ञान देण्याचा प्रयत्न,
कला विषयात विविध गुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य,गायन,अभिनय तसेच टाकावू पासून टिकाऊ विविध वस्तू बनाविणे व त्यांचा वापर करणे.
स्वच्छतेचे महत्व पटावे यासाठी हात धुवा दिन,आमची मिनी घंटागाडी,स्वच्छ शाळा,आजचा स्वच्छ विद्यार्थी यासारख्या उपक्रमांची अंमलबजावणी .
निरोगी व शारीरिक तंदुरुस्ती व त्यातून व्यक्तीमत्व विकास यासाठी योगवर्ग व योगासन स्पर्धा आयोजन.
क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक महोत्सव आयोजन.
विज्ञान प्रदर्शने,मेळावे,शिक्षणमहोत्सव यातून जिज्ञासा जागृती,वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रद्धा निर्मुलन यासाठी प्रयत्न.
सामाजिक कार्य –
शिक्षणासंबंधी –(सामाजिक कार्याचे विवरण)
शाळा आदिवासी भागात असल्याने पालक व विद्यार्थी यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेवून नियमित विद्यार्थ्याना विविध संस्थांच्या माध्यामातून लेखन साहित्य,कपडे,दप्तर अशी मदत मिळवून देत आहोत.
वस्ती,पाड्याहून येणाऱ्या गरजू मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत.
स्वतः गरजू विद्यार्थ्यांसाठी स्थापन केलेल्या संवेदना मंचाच्या माध्यमातून गणेशोत्सवात एक पेन एक वही दान करा उपक्रम राबवून विविध पाच शाळेतील विद्यार्थ्याना लेखन साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
वाचन कट्ट्यासाठी मोठ्या छत्र्या तसेच बुकऱ्याक समाज सहभागातून उपलब्ध केलेल्या आहेत.
इतर (सामाजिक कार्याचे वर्णन) –
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध ठिकाणी सामाजिक संस्थाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेत सहभाग.
अवयव दान मोहिमेत सक्रीय सहभाग व स्वतः अवयवदान नोंदणी करून शाळेतील सर्व शिक्षकांना प्रेरित करून सर्व शिक्षकांची अवयवदाता म्हणून नोंदणी केली.
हरीतकुंभ अंतर्गत शाळास्तरावर विविध उपक्रमांची अंमलबजावणी.
शाळेत विविध ठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, मोहिमेत सातत्याने सहभाग.
पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत विविध उपक्रमांत सहभाग तसेच गाव परिसरात वनराई बंधारे बांधण्यात सहभाग.
लेक वाचवा,लेक शिकवा,स्रीभृणहत्या,बालमजुरी आदी विषयांवर पथनाट्यातून जनजागृती साठी प्रयत्न.तंबाखूमुक्तीसाठी व्यसनमुक्ती पाडवा साजरा.
पर्यावरण संवर्धन याअंतर्गत नाशिक सायकलीस्टच्या माध्यमातून 2 वेळा प्ल्यास्टीकमुक्त नाशिक पंढरपूर सायकल वारी याशास्वीरीत्या पूर्ण केली आहे.
कुटुंब कल्याण अंतर्गत गावात जनजागृती फेरी ,माता परिसंवाद,अशा विविध उपक्रमांत सहभाग व मार्गदर्शन.
गावातील गरजूंना नियमित विविध संस्थांच्या माध्यमातून कपडे मिळवून देणे.
नाशिक शहर वाहतूक नियंत्रण व ध्वनी प्रदूषण नियंत्रण यासाठी नाशिक सायकलीस्ट च्या माध्यमातून सहकार्य.
विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी म्हणून केलेली विशेष कामगिरी व उपक्रम –
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध ठिकाणी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणे.
गुणावता व शैक्षणिक दर्जा वाढावा म्हणून स्वखर्चातून मोठ्या प्रमाणावर संपूर्ण शाळेसाठी प्लायवूडपासून ज्ञानरचनावादी स्मार्ट बोर्ड निर्मिती.
वाचन प्रेरणा दिनातून वाचन क्षमता वाढीस लागून ज्ञान वृद्धिंगत व्हावे यासाठी आमचा स्वर्णकौर वाचन कट्ट्याची शाळेत स्थापना.
नियमित विज्ञान प्रदर्शनात सहभाग व सातत्याने उल्लेखनीय यश.
क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्याना वाव मिळावा म्हणून नाशिक महाम्यारेथोन मध्ये शाळेतील 19 विद्यार्थ्यांची मोफत नोंदणी करून 5 की मी स्पर्धेत सहभाग घेवून 19 विद्यार्थ्यानी पदक मिळविले .
योगविषयक आवड निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्याना योग प्रशिक्षण देवून योग गुरु रामदेव बाबा यांचे समक्ष योग प्रात्याक्षिके करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
स्वच्छतेतील सहभाग –
शाळेची स्वच्छता – शालेय परिसर हा नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रमांतून प्रयत्न केला जातो.परिसर स्वच्छता व स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्याना पटावे व स्वच्छतेचे काम सुलभ व्हावे यासाठी स्वच्छता हीच सेवा अभियान अंतर्गत आमची मिनी घंटागाडी हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. स्वच्छ भारत अभियान उपक्रमाची शाळापातळीवर व गावपातळीवर अंमलबजावणी.
मुलामुलींची स्वच्छता – शाळेत मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे व पाण्याची व्यवस्था केलेली आहे.तसेच मध्यान्ह भोजनापूर्वी व नंतर हात धुण्यासाठी Handwash station तयार केले आहे.ज्यांच्या घरी स्वच्छतागृह आहे अशा मुलांच्या घरी भेटी घेवून अभिनंदन करून शौचालय वापरासाठी प्रबोधन केले आहे.तसेच विद्यार्थी नियमित स्वच्छ व नीटनेटके राहावेत यासाठी दोन वर्षापासून शाळेत आजचा स्वच्छ विद्यार्थी हा उपक्रम सुरु आहे .
शिक्षकाचे स्वतःचे छंद –
कात्रण संग्रह करणे,नृत्य,अभिनय,टाकाऊतून शैक्षणिक साहित्य निर्मिती
करणे,फोटोग्राफी,बाहुलीनाट्य,चित्रकला,योगा,सायकलिंग इत्यादी.
http://deepakdambalekwt.wordpress.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre
No comments:
Post a Comment