Wednesday, 1 May 2019
Maharashtra din
१ मे कामगार दिवस...१ मे महाराष्ट्र दिवस...
१. मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.भाषावार प्रांत रचनेनुसवार आपला महाराष्ट्र नावारूपास आला... गोविंदाग्रजांच्या शब्दात सांगायचे म्हणजे राकट देशा..कणखर देशा...फुलांच्या. ही देशा....अश्या या निसर्ग सौंदर्य लाभलेल्या महाराष्ट्राला प्रांतवादाची... सांप्रदायिकतेची...भाषिक अतिक्रमणतेची...किड लागली आहे का हो? सह्यांद्रीच्या घाटावर परकियांच्या हातून महाराष्ट्र हिसकावून घेऊन स्वराज्य निर्माण करणारे कणखर हात या महाराष्ट्र भुमीतच जन्माला आले.जातीवादीयतेचे मुळे खोदून नष्ट करणारे दलितांचे कैवारी ही याच भुमीतले...सावरकर...आगरकर कर्वे..टिळक असे ज्ञानी याच मातीतले.सावित्री... जिजाऊ... अहिल्याबाई..या रणांगिणी सुध्दा याच महाराष्ट्रातले....
अतिशय जाज्वल्य इतिहास लाभेल्या या महाराष्ट्रात...पंढरीनाथ. ज्ञानेश्वरांच्या भुमीत.. एकनाथ व संत चोखामेळांच्या किर्तनात भारूळात.. गोंधळात रममाण होणारे आपले मन क्षिण होत चालले का??कठोर..दगडाचे रूप घेऊ पाहत आहे का? झाडे गेले..जंगले मेली... पाण्यासाठी जमिन फाकली....आभायाकडे डोळे फाडून आ वासून बसलेला माझा कुळांचा. अन्न दात्यांचा महाराष्ट्र आज राहिला का हो? माझ्या मराठी भाषेची बोलू कौतुके...अमृतातेही पैजा जिंके..ज्ञानोबाने सांगितलेला महाराष्ट्र आज कुठेतरी अदृश्य झाल्या सारखा वाटतो...लतादिदी ..आशाताई......उषा दिदी...भिमसेन जोशी... हृदयनाथ .. शिरवाडकर.. कुसुमाग्रज..पु.ल.अश्या. असंख्य असंख्य...मात्तबरांचा महाराष्ट्र...साने गुरुजी सारख्या असंख्य मराठी मनांना सन्मानाने जगण्याची क्षमता निर्माण करण्याकरिता रात्रंदिवस एक करणार्या माझ्या जि.प.गुरूजींना सन्मानाने डोक्यावर घेणारा महाराष्ट्र ज्या दिवशी निर्माण होईल...तोच खरा महाराष्ट्र दिन होईल....जय.. महाराष्ट्र...
deepakdambalekwt@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre
No comments:
Post a Comment