Thursday, 28 February 2019
Vidyandin
Rastriy vidyan divas. विज्ञानातील_२००_सोपे_प्रयोग*
(प्रयोग क्र.१५१ ते २०० )
INNOVATIVE SCIENCE CENTER -SARVA SHIKSHA ABHIYAN
आपल्या घरातील तसेच इयत्ता ५ ते १० मधील विद्यार्थ्याकरिता अतिशय उपयुक्त अशा १५० विज्ञान प्रयोगांची लिंक आपणास देत आहोत.आपण ती मोबाईल मध्ये यु ट्यूब डाऊनलोड च्या विविध अप्स द्वारा डाऊनलोड करून सेव्ह करू शकता किंवा कॉम्पुटर वर URL लिंक wwwनंतर ss टाइप करून save करू शकता..
सौजन्य -नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र, सर्व शिक्षा अभियान महाराष्ट्र
विनंती – कृपया सदर विडीओ लिंक जास्तीत विद्यार्थी तथा विज्ञान शिक्षकांपर्यंत शेयर करावी.
151 Tornado in a bottle
https://youtu.be/ObdZyhcG6CA
152 Floating Astronaut
https://youtu.be/ObdZyhcG6CA
153 FLOATING INDIAN ROCKET TO MOON
https://youtu.be/T5L9U_njidQ
154 Magnetic field viewer
https://youtu.be/FnXrUfjAeSE
155 PLANETS CARD GAME
https://youtu.be/blg2IX8a8A8
156 Human Jaw model
https://youtu.be/LO30lEpAnfc
157 Catapult
https://youtu.be/8RzWQZAhX-0
158 Strength of Paper pillars
https://youtu.be/JvKmmDG5e-w
159 Inverted glass of water with card
https://youtu.be/XQ-NXitHrxw
160 Inverted glass of water with cloth
https://youtu.be/hpWVY8lD8e4
161 Water rising in cup
https://youtu.be/Nlzz725jnUA
162 Inverted bottle of water
https://youtu.be/nBQZ5C8qpHo
163 Structures- sticks
https://youtu.be/1lpY7xpda_0
164 Structures - Paper cups
https://youtu.be/tsm2nl1ECPg
165 Germination of seeds
https://youtu.be/E8P-u8LlIew
166 Starch Test for food items
https://youtu.be/4eg87CVBjVw
167 Levitating Pencil
https://youtu.be/QoTkYGH3kK8
168 DIY magnetic compass
https://youtu.be/PDvf-ZvLSbs
169 Which one has more volume
https://youtu.be/iFOz7fPKBeI
170 Leaky bottle- Air pressure
https://youtu.be/mENfF3lzAnc
171 Blowing balloon in a bottle
https://youtu.be/68FtHFG2HAs
172 Lungs model
https://youtu.be/VB5Sh7XzqNo
173 INERTIA CHALLENGE
https://youtu.be/Gf60Xiuvk_k
174 STRAW SPRINKLER
https://youtu.be/ZDNlNgF_nO0
175 SMALL LIFTS HEAVY
https://youtu.be/joGsTPvOFc4
176 Electromagnet
https://youtu.be/oA6TWZ7fiic
177 Measurement of physical quantities Measuring Units
https://youtu.be/g8-Lwo0K9AE
178 Heat Modes of heat transfer Conduction
https://youtu.be/fmVGzLLmNlM
179 Modes of heat transfer Expansion and contraction of a solid substance
https://youtu.be/deIUjeA8GGg
180 Modes of heat transfer Calorimeter
https://youtu.be/CTisbDOT1vk
181 Balloon rocket
https://youtu.be/QbdHcOmhaY0
182 Magic Roll back can
https://youtu.be/akEXgXDx_hU
183 The spinning spindle
https://youtu.be/Q615OwqfWkI
184 TWIN PLANES
https://youtu.be/XDHmhDQV6V4
185 Change in effort due to change in pivot position
https://youtu.be/y-ybbUBTRVY
186 Thaumatrope
https://youtu.be/mrt2CGZj94s
187 Piercing a balloon challenge
https://youtu.be/LaWtQJHnH2A
188 CLOTH SIPHON
https://youtu.be/qR6-uaWJeYc
189 Dancing coin
https://youtu.be/jUbfFjp_Pus
190 Reflection of light
https://youtu.be/Wj5P1AV4i7Y
191 MAGIC STRAW – STATIC ELECTRICITY
https://youtu.be/u25EDc851_c
192 Static Electricity
https://youtu.be/xUj9JjLGNCY
193 Jenga
https://youtu.be/fCcRaglV1us
194 Balancing Nails
https://youtu.be/kRf04cg6mOc
195 Genie in a bottle
https://youtu.be/QCYGybrauJI
196 Bottle of Brahma
https://youtu.be/7HkcNgWSmOY
197 Ping Pong ball cup challenge
https://youtu.be/0FxOcJrJxOE
198 Water fall race
https://youtu.be/s2CqJ8z88NA
199 REFLECTION IN A PLANE MIRROR
https://youtu.be/6lz_QrsQ-fE
200 Laws of Reflection
https://youtu.be/jhE_j50Zyus
z.p.p.s.nagazari/mandava
Tq. Kinwat dist. Nanded
deepakdambalekwt@gmail.com
Tuesday, 26 February 2019
Saturday, 23 February 2019
Rastrasant Gadagebaba
🔷" *राष्ट्रसंत* "🔷
संत झाला राष्ट्राचा
त्याग करून सर्वस्वाचा
उपदेश देता ज्ञानाचा
साधा सुधा
किर्तन करून माणूस
जागा करी आतला झोपलेला
मेलेल्या पोराचे दूख
पचऊन
रंगला कीर्तनात
नावापरी हाती गाडगे
पण मनान दिलदार
लोकांना इचारी सवाल
तेहतीस कोटी देव गाई
पोटी कशीकात
पोटाले मोडा भाकरी
हातावर करा
पाहुण्याला
पाहुणचार कमी करा
पर लेकरा
इद्या शिकवा करा सज्ञान
मिळे लोकाकडून पैसा तो
लावी शिक्षण संस्थात
आश्रम काढून
देई आधार अनाथास
नका घेऊ बळी मूक्या
प्राण्याचा
दगड देवापरी खराटा
मोलाचा
माणूस शोधा माणसाचा
बाबासाहेब गाडगेबाबा झालीया
भेट
आश्रम अन शिक्षण संस्था
दिली बाबासाहेबांना दान
म्हणे तूमच्या परी नाही सांभाळेल
कोण
कर्मयोग्याचे कर्म
जगाला तारणारे मर्म
स्वच्छतेचा धर्म शिकवला
बरा
माणुसकीचा दिला धडा
प्रबोधनकार राष्ट्रीय संत गाडगेबाबा जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹
जन्म-२३\०२\१८७६
मृत्यू -२०\१२\१९५६
deepakdambalekwt@gmail.com
Friday, 22 February 2019
Digitalschoolgrup
📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥
*युग आहे डिजिटलचा तर ,*
*अँटॕच रहा चँनलला...*
https://www.youtube.com/channel/UCLxx4ZRzvxmvvxmOl5DiPwA
Thursday, 21 February 2019
Wednesday, 20 February 2019
Exam
🔴 *हार्दिक शुभेच्छा!* 🔴
*फेबु /मार्च 2019 दहावी/बारावी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!*
*परीक्षा कालावधीत मुलांनी घ्यावयाची खबरदारी*
*परीक्षेचेच्या अगोदरच्या दिवशी*.....
1) पूर्ण प्रकरण न वाचता नोट्सची उजळणी करा.
2) नवीन काही वाचू नका.
3) संकेत शब्द,सूक्ष्म टिपणे,आकृत्या,नकाशे,तक्ते यांचे धावते निरीक्षण करा.
4) झोप पूर्ण व सलग घ्या.जागरण टाळा.
5) पहाटे पासूनच शांत व उत्साही वातावरणात अभ्यासाला सुरुवात करा.
6) परीक्षेला लागणाऱ्या आवश्यक साहित्याची जमवाजमव करा.सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवा.
7) कपड्यांना इस्त्री व बुटाला पाँलीस करुन ठे
*परीक्षेला निघताना*....
8) परीक्षेला निघताना आवश्यक सर्व साहित्य सोबत घ्या. ओळखपत्र,हाँल तिकीट,पेन(किमान तीन),पेन्सिल,शार्पनर,स्केल,लाँगरिथम,कंपासबाँक्स,खोडरबर,पँड, पाण्याची बाटली,रुमाल,घड्याळ,गरजेनुसार रुपये सोबत ठेवावेत.
9) हलका आहार घ्यावा.(साधी पोळी,भाजी,वरणभात). पोटभर न खाता थोडी भूक शिल्लक ठेवा.
10) रस्त्यातील वाहतूक,ट्रँफिक जँमचा विचार करुन योग्य वेळेत निघा.
11) सायकलने प्रवास करत असाल तर रुमाल/टोपी वापरा.मोटर सायकलने जात असाल तर हेल्मेट अवश्य घाला.
12) परीक्षेच्या अर्धा तास सेंटरवर पोहचा.
*परीक्षा हाँलमध्ये*
13) परीक्षा हाँल मध्ये प्रश्नपत्रिका हातात पडेपर्यंतचा संपूर्ण काळ मानसिक दृष्ट्या महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवा.यासाठी.....
14) मन स्थिर ठेवा.जो अभ्यास आपण केलेला आहे,तेवढे आपण निश्चितपणे लिहू शकतो यावर विश्वास ठेवा.
15) मागे काय झाले,पुढे काय होईल याची चिंता न करता शांत बसा.कोणतीच प्रश्नोत्तरे आठवण्याचा प्रयत्न करु नका.
*परीक्षा देताना*.....
16) खूप सोपे प्रश्न असतील तर खूप घाई करु नका.त्यामुळे Skill Mistakes होतात.हे लक्षात ठेवा.
17) अवघड प्रश्न असेल तरी घाबरू नका.त्याला सामोरे जा.तुम्हाला ते अवघड वाटत असतील तर ते ईतरानाही अवघड असतात.त्यातल्या त्यात जो धिराने त्या प्रश्नाला सामोरे जातो,उतर लिहण्याचा प्रयत्न करतो तो अधिक गुण मिळवतो.जो त्याचा ताण घेतो तो अधिक चूका करतो.
18) कसाही प्रश्न असेल तरी मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन.शेवटच्या आत्मविश्वासाने मी पेपर लिहीन असा निर्धार सातत्याने करा.
19)चुकूनही काँपी करु नका, कोणी आग्रह करत असेल तरीही करु नका.इतर विद्यार्थी काँपी करतात तेव्हा आपल्याला वाटते,की ते आपल्या पुढे जातील; पण अशा मुलांचा पाया कच्चा असल्याने ते भविष्यात मागे पडतात.त्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे जा.
*उत्तरप्रत्रिका सोडविताना*.....
20) सुवाच्च अक्षरात आपला परीक्षा क्रमांक ,दिनांक,केंद्र अशी सर्व माहिती अचूक भरा.
21) बारकोड चिकटवण्यापूर्वी आपलाच असल्याची खात्री करा.
22) उत्तरप्रत्रिके मध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
23) प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा.
25) निळ्या किंवा काळ्या शाईच्याच पेनचा करा.
26)सोपे प्रश्न लक्षात घ्या.प्रश्नांची निवड महत्त्वाची असते.
27) विचारले तेच व तेवढेच लिहा.पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण होतो .
28) प्रश्नांचा क्रमांक अथवा उपप्रश्न क्रमांक ठळक अक्षरात ठेवा.
29) उत्तराचा आराखडा मनात तयार करा.
30) हिंमत ...हौसला बुलंद ठेवा.
31) उत्तरप्रत्रिकेवर कोठेही डाग पाडू नका.परीक्षकांसाठी सूचना लिहू नका.
*पेपर झाल्यावर*...
32) पेपर नंतर उतरांबाबत मित्रांसोबत र्चचा टाळा.
33) किती गुण मिळतील यांची बेरीज करीत बसू नका.
34) काही उत्तरे चुकली असल्यास त्यांचा विचार न करता जे बरोबर लिहले आहे,त्यावर समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.
35) झालेल्या पेपरची चिंता न करता पुढच्या पेपरची तयारी सुरू करा.
*पालक व शिक्षकांनी हे जरुर करा*.....
*झालेल्या पेपर वरील चर्चा मुला बरोबर करु नका.*
*मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्याशी संवाद साधून त्या सोडविण्यासाठी मदत करा*
*अभ्यासाला पोषक वातावरण राहील याचा प्रयत्न करा.*
*मुलांच्या प्रगतीबद्द्ल व त्यांच्यातील बद्द्लाबद्द्ल प्रोत्साहन द्या.*
*मुलांना विचार करता येतो,त्यांना त्यांची मतं असतात याचं भान ठेवा.*
*मुलांच्या चांगुलपणावर मनपूर्वक विश्वास ठेवा.*
*पुन्हा-पुन्हा अभ्यासाबाबत त्यांना विचारु नका.*.
*इतरांशी मुलाची तुलना करु नका.*
deepakdambalekwt@gmail.com
Tuesday, 19 February 2019
Chatrapatishivaji
*🙏🏻 वदनीय छ.शिवराय.. !!🙏🏻*
*प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी, रणधुरंधर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर,* *महाराजाधिराज,श्रीमंत,श्री,श्री,श्री..!🌹छत्रपती शिवाजी महाराज..!!🌹 महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचा..! 🌹आज शिवजन्मोत्सव* *सोहळा..!🌹*
💐 *शिवनेरीची माती सुद्धा शिवरायांना जपत होती..!*
*रायगडाच्या बुरूंजालाही स्वराज्याची शपथ* *होती.. !!*
*राजे जन्माला आले ते एका गडावर आणि राजांनी आपला देह ठेवला तोही दुसऱ्या एका गडावरच..!*
*१९ फेब्रु.१६३० ते ३ एप्रिल १६८० हा राजांचा कालखंड..!*
*अवघं उणंपुरं फक्त ५० वर्षांचं आयुष्य लाभलं आपल्या छत्रपती राजांना.. !!*
*३६ वर्षे नंग्या तलवारीशी सामना,३६o किल्ल्यांचा मालक,१११ किल्ले बांधले,पावणेदोन वर्षे द. दिग्विजय,६ महिने आग्रा असा अव्याहतपणे कारकिर्द प्रवास, दगदग* *राजांना सहन करावी लागली.. !!*
*जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे शिवराय, सज्जनांचा आधार तर दुर्जनांचा* *कर्दनकाळ होते...!*
*वयाच्या १४ वर्षी* *स्वराज्य कार्याची* *घोडदौड मांसाहेब जिजाऊंच्या संस्काराखाली सुरु झाली ती शेवटपर्यंत थांबलीच नाही.. !!*
*अनेकविध महाराष्ट्रावर चालून आलेल्या संकटाना धीरोदत्तपणे सामोरे जाणारे शिवराय.. !! शक्ती चालत नाही तिथं युक्ती वापरली. मावळ्यांना जीव की प्राण वाटणारे शिवराय...! सारं सारं काही शिवरायांसाठी एका पायावर करायला तयार राहणारे मावळे शिवराय देतील ती जबाबदारी समर्थपणे पेलत होते..!*
*आजच्या युवा पिढीला ध्येयवादाची संता देण्यासाठी शिवचरित्राची गरज* *आहे.दूरितांच्या निर्मूलनासाठी आणि सौजन्याच्या* *परित्राणासाठी अवघ्या राष्ट्राला महाराज नावाच्या स्फूर्तीची गरज* *आहे..!*
*समर्थ रामदास तर म्हणतात, ' शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप.... !!*
🌹 *जगातल्या सर्व राजांनी कौतुकानं निरखावं,*
*जगातल्या सर्व राजांनी* *साक्षेपानं अभ्यासावं* ,
*नि जगातल्या सर्व विचार साधकांनी सतत स्मरण करावं असं...,*
*दैदिप्यमान आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे 🙏🏻वंदनीय छत्रपती शिवराय... !!🙏🏻*
*महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांना...! 🌹छत्रपती राजांना... !!🌹 तयांच्या,आज सुदिन क्षणी १९ फेब्रुवारी...! 🌹शिवजन्मोत्सव दिनी...!!🙏🏻* *त्यांच्या चरणी मानाचा मुजरा.. !!* deepakdambalekwt@gmail.com
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Monday, 18 February 2019
Saturday, 16 February 2019
PM/pandharkawada
सहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक स्कुलच्या नवीन इमारत संकुलाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन
नांदेड दि. 15 :- किनवट आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक स्कुल सहस्त्रकुंड येथील नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते शनिवार 16 फेब्रुवारी 2019 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून होणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना सहस्त्रकुंड येथे ऑनलाईन दाखविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.
या इमारतीचे बांधकाम सन 2016-17 मध्ये सुरु करण्यात आले आहे. या बांधकामास 24 महिण्याचा कालावधी देण्यात आला होता. या इमारतीसाठी 15 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम 10 हजार 862 चौ.मी. इतके करण्यात आले आहे. शाळा इमारत बांधकाम अंतर्गत शाळा इमारत, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह, भोजनगृह, प्राचार्य निवासस्थान, शिक्षक निवासस्थान, खेळांचे मैदान, अभ्यंगतासाठी शौचालय, विद्युतघर, खेळाडुसाठी मैदानावर चैजिंग रुम (शौचालयासह), वाहनतळ, अंतर्गत पक्के रस्ते, संरक्षक भिंत, ट्रिट लाईट, पाणी साठवण अंडरग्राउट टाकी 1.5 लक्ष लिटर. या शाळा बांधकामासाठी 15 एकर जमिन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जमिनीवर 24 कोटी 16 लाख रुपये बांधकाम अंदाज पत्रकास मंजुरात प्राप्त असून इमारत संकुल बांधकाम पुर्ण झालेले आहे.
एकलव्य रेसिडेसिंयल पब्लीक स्कुल ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या शाळेत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत वर्ग मान्यता आहे. या शाळेची एकुण प्रवेश क्षमता 420 असून 210 मुले व 210 मुलींना प्रवेश देण्यात येतो. अमरावती विभागातील एकुण 13 जिल्ह्यासाठी चिखलदरा व सहस्त्रकुंड या दोन शाळामध्ये विद्यार्थ्यांना पात्रता परिक्षा घेऊन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येतो. या शाळेचा आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लाभ होणार आहे.
Samarpitkavita
माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....
बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...
घायाळ जरी झालो तरी
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...
लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे,
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून,
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई,
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...
तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा !
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..
तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...
रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...
माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...
आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे
आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस,
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
Jayhind
deepakdambalekwt@gmail.com
Friday, 15 February 2019
Jayhind
*...*
पहाटे झोपेत असताना ,
काशमीरात तैनात असलेल्या 'मराठा लाईट इन्फन्टरी'तल्या एका मित्राचा फोन येतो...... 20 तास ड्युटी करून त्याचा आवाज कमालीचा थकलेला दबलेला असतो... माझा जीव कातरून जातो...
.
तो म्हणतो- सच्या घरी फोन कर रं माझ्या
---बायको -दोन बारकी लेकरं -कुणीच कशी फोन उचलनायती..??. आता ड्युटी संपली माझी- पहाटेपासणं फोन करतोय... फक्त रिंग येतीय..
.
.
मी पुण्यावरनं त्याच्या घरी फोन करतो...
पण 12-13 वेळात एकदाही फोन उचलला जात नाही... काळजी वाटायला लागते........
.
.
मग गावाकडच्या एका मित्राला फोन करून त्याच्या घरी जाऊन यायला सांगतो... अंधारात चाचपडत तो त्याच्या घरी पोचतो..
कित्येक वेळा बेल वाजवूनही दार उघडलं जात नाही...
.
.
परत मी त्याच्या घरी फोन करतो...
8 व्या वेळेला यावेळी फोन उचलला जातो, पलीकडून वाहिनीचा घाबरलेला
-(कधीपासून) रडत असलेला आवाज येतो...
.
थोडासा चिडलेला मी विचारतो --फोन का उचलत नव्हता वहिनी ??
.
.
वाहिनी रडायला लागतात... जोरात!
बांध फोडतात... कानात रडायचा जोरात अन विचित्र आवाज घुमायला लागतो..,
ते ऐकून, त्यांचा झालेला अवतार -मला डोळ्यासमोर स्पष्ट, स्पष्ट दिसायला लागतो... तोंडा नाकातून गळत असलेली त्यांची लाळ -माझ्या 250 किलोमीटर दूर असलेल्या हातावर पडायला लागते...ओघळायला लागते..!
.
शेवटी रडत-रडत त्या एवढंच म्हणू शकतात...
.
.
.
.
.
.
फोन उचलायला भीती वाटतेय हो भैय्या आता... जीव फाटत चाल लाय हळूहळू माझा
......
मित्र मैत्रिणींनो...
तुम्ही आता जेवत असाल, सहज दिवसभराच्या बातम्या पहात असाल, किंवा आजचा दिवस हसत साजरा करत असाल, आई वडिलांशी निवांत गप्पा मारत असाल, आपल्या पोरांसोबत खेळत असाल, किंवा उद्या परवा पिच्चरला जायचा प्लॅन करत असाल... चांगलंच आहे ते.. नक्कीच...
माझी काहीच हरकत नाही...
फक्त एवढंच सांगायचं होतं की
.
.
.
...त्या आज काशमीरात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या घरची परिस्थिती आज या घडीला ही अशी आहे......
अशे दोन हजार पाचशे सत्तेचाळीस सैनिकांच्या घरचे फोन सध्या जोरर,जोरात खणखणतायत.....
पण ते उचलायची हिम्मत .................
एक फौजी
*भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻*
Thursday, 14 February 2019
Santsevalalmaharaj
*संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने* 15 फेब्रुवारी, 2019
*समाजसुधारक संत सेवालाल महाराज*
आपल्या महाराष्ट्राला संतांची पुरातन अशी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या मातीला जसा पराक्रमाचा वारसा आहे तसा संतांच्या विचारांचा गंध आहे.महाराष्ट्र भूमीत अनेक जाती धर्मातील साधुसंत प्रबोधनकारांनी जन्म घेतला याच थोर साधू संतांच्या विचारातूनच महाराष्ट्राची जडणघडण झालेली आहे.समाजातील वाईट चालीरीती,अज्ञान, जाती व्यवस्था नष्ट करण्याचे महत्कार्य संतांनी केळवे आहे.संताची शिकवण आजही आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. संतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आजही गरज आहे.
*15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे त्या अनुषंगाने समाजसुधारक संत सेवालाल महाराजांच्या विचारांना उजाळा देणारा हा लेख प्रपंच*
थोर संत समाजसुधारक एखाद्या विशिष्ट जातीत एखाद्या विशिष्ट धर्मात जन्माला येत असले तरी त्यांचे कार्य त्या जातीसाठी मर्यादित राहत नाही, तर त्यांचे कार्य राष्ट्राच्या प्रत्येक जीवासाठी उपयोगी असते. समाजाला योग्य दिशा देण्याचे व योग्य मार्गावर घेऊन जाण्याचे कार्य संत करीत असतात. अशाच एका थोर संतांची माहिती या लेखातून आपल्यासमोर सादर.
भारतातील अनेक थोर संतांपैकी एक संत सेवालाल महाराज इसवी सनाच्या आठराव्या शतकात होऊन गेले. हजारो वर्षापासून अंधारात खितपत पडलेल्या,रानावनात भटकंती करून गुजराण करणाऱ्या बंजारा समाजात संत सेवालाल महाराजांचा जन्म झाला.भारतीय संस्कृतीत विविध भाषा,धर्म, पंथ,जाती,वंश,बोली भाषा वेशभूषा इत्यादींचा सुंदर मिलाफ दिसून येतो. आपल्या अनोख्या सांस्कृतिक वैशिष्ट्यानी सर्वांना आकर्षित करणारा समाज म्हणजे भारतातील बंजारा समाज होय.भारतातील वेगवेगळ्या प्रांतात विखुरलेल्या बंजारा समाजात संत लखीशा बंजारा नंतर प्रभावी आणि समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या संतांपैकी एक संत म्हणजे संत सेवालाल महाराज.सेवालाल महाराजांची शिकवण म्हणजे समाजासाठी संजीवनीच ठरले.पूर्वीच्या काळी बंजारा समाजाला अक्षर गंधहीन नसल्याने संत सेवालाल महाराजांचे कोणतेही साहित्य लिखीत स्वरुपात उपलब्ध नाही.परंतु आता त्यांचे दोहे,वचने, कवणे इत्यादींचे संकलन पुस्तक रुपाने होत आहे.फिरस्ते व्यापाराच्या निमित्ताने भारतभर भ्रमंती करीत असताना संत सेवालाल महाराजांनी भारतातील अनेक संतांच्या कार्याविषयी माहिती मिळाली,त्यातून सत्याचा शोध घेऊन आपल्या समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविण्याचे काम संत सेवालाल महाराजांनी केले. समाजात संत सेवालाल महाराज म्हणून ओळखले जाणारे संत सेवालाल त्यांचा जन्म बंजारा समाजात माघ कृष्ण पक्ष शके १६६१ दि. १५ फेब्रुवारी, १७३९ रोजी तेलंगणा राज्यातील गुलालदोडी ता. गुत्ती जि.अनंतपूर येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धर्मणी होते.भीमा नाईक तांड्याचे नायक होते.संत सेवालाल महाराजांचा एक संत म्हणून विचार करताना त्यांचे विचार भारतीय संत परंपरेतील भगवान महावीर, संत कबीर,संत बसवेश्वर, संत तुकाराम,संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या तोडीची आहेत.परंतु त्यांचे विचार अलिखित असल्याने पुस्तक स्वरूपात उशिरा आल्याने जगाला त्याची फारशी माहिती नसावी.
*संत सेवालाल महाराजांचे मानवतावादी विचार:-*
श्री संत सेवालाल महाराजांचे विचार हे मानवतावादी शिकवण देणारे होते.समाजातील भोळ्या समजुती,अंधश्रद्धा , व्यसनाधीनता,अनितिचे व्यवहार,भूतदया, निसर्गप्रेम,स्वकर्तुत्वावर विश्वास,सत्य-अहिंसा इत्यादींविषयी महान विचार,वचने,दोहे व भजने या रूपात प्रकट झालेले आहेत.
१. नेहमी सत्याचे आचरण करा:- सत्य हाच खरा धर्म आहे, नेहमी सत्याचे आचरण करावे. सत्य जाणणे यातच खरे जीवनाचे सार आहे.हे सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात-
*सत्यधर्म लिनता ती रेंणू ।सदा सासी बोलंणू । हर वातेनं सोच समजन केवणू । भवसागर पार कर लेंणू ।
भावार्थ- सत्य हाच खरा धर्म आहे. जीवनात नेहमी सत्याचे आचरण करावे नम्रतेने इतरांशी वागावे,प्रत्येक गोष्ट आधी समजून उमजून घेऊन मगच बोलावे तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही जीवनरुपी भवसागर तरून जाल.
२.अहिंसा:-अहिंसा म्हणजे केवळ कोणाची हत्या न करणे एवढाच त्याचा अर्थ नसून काया,वाचा आणि मनाने कोणालाही न दुखावणे होय.गाय कितीही भाकड असली तरी तिला कधीच कसायाला विकू नका,देवी ही सर्वांची आई आहे ती कधीच आपल्या मुलांवर कोपत नाही.म्हणून दुःख,पिडा,त्रास देत नाही. तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या-बकर्यांचा बळी देण्यापेक्षा बेल फुल वाहून शिऱ्याचा नैवद्य देऊन प्रसन्न करा. असा साधा-सोपा ईश्वरभक्तीचा मार्ग संत सेवालाल महाराज सांगतात.असे सांगताना म्हणतात-
* वाडी वस्तीनं सायी वेस । किडी मुंगीनं सायी वेस। जीव जणगाणींन सायी वेस । बाल बच्चानं सायी वेस । सेन सायी वेस।।
हे देवी माते या सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांचे रक्षण कर, वाडी वस्त्या मुंग्यांचे रक्षण कर,मुलाबाळांचे गुराढोरांचे रक्षण कर,सर्वांचे कल्याणकर. थोडक्यात त्यांची वरील रचना बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणावे लागेल असे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या शिकवणी संत सेवालाल महाराज देत.
३.सद्गुणांची जोपासना:-
सद्गुन हेच मनुष्याचे खरे धन आहे.त्याशिवाय जीवनाला काहीच अर्थ नाही.व्यसनाधीनता, हिंसाचार आणि अनितीचे व्यवहार,असत्यापासून माणसाला दूर ठेवण्यासाठी संत सेवालाल महाराज सांगतात
*संणो सांमंणो मार गोर भाई।
लाज रखाडो धर्मेरी ।
मत लो जीव, काडो मत लोही ।
दारू मत पीओ कोई।
धर्मेरी बानी रखाडो भाई ।
कोई मत करजो लुच्ची-लबाडी ।
मत करो रंडीबाजी।
मोरियो केसुला नाहीं।*
भावार्थ-काय तर धर्माची लाज राखा,अहिंसा कोणी करू नका,पशुबळी देऊ नका,दारू कोणी पिऊ नका,चांगल्या संगतीत राहा.लुच्ची-लबाडी,रंडीबाजी करू नका कोणाचीही फसवणूक करू नका ही शिकवण जरूर आचरणात आणली तर पळस ज्याप्रमाणे उन्हात राहूनही बहरते,त्याप्रमाणे तुमचा सुद्धा उत्कर्ष होईल.
४.कोणासही दंडीत न करणे:-
समाजात कष्ट करणारे राबणारे हात अनेक आहेत, ते निरक्षर असून लाचारीचे जिणे जगत आहेत,त्यांचे शोषण करणे थांबवा याविषयी सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात-
* गोर गरिबेनं दांडन खाये।
ओर सात पिढी नरकेम जाये।
ओरे वंशेपर दिवो कोणी रिये ।*
मनुष्याने नेहमी सर्वांशी न्यायाने वागले पाहिजे.त्यासमोर गरीब-श्रीमंत,श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करू नये. जो कोणी गोरगरिबांना न्याय दंड करील त्याच्या सात पिढ्या नरकात जातील त्यांच्यावंशवेलीवर दिवा राहणार नाही.
५.स्व-कर्तृत्वावर विश्वास :- सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचे सूत्रच जणू सेवालाल महाराज पुढील दोह्यातून सांगतात.
*तम सौता तमारे जीवनेमं दिवो लगा सको छो ।
कोई केनी भजो-पुजो मत ।
कोई केती कमी छेनी ।
सौतार वळख सौता करलीजो ।
भजे-पुजेमं वेळ घालो मत ।
करणी करेर शिको, नरेर नारायण बंन जायो।
जाणजो...छाणजो...पचच माणजो…।*
प्रत्येक व्यक्तीत उपजतच उर्जा, शक्ती,सामर्थ्य,गुणवत्ता, बुद्धिमत्ताव योग्यता असतेच.त्यासाठी सर्वप्रथम माणसाचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे.कोणीतरी येईल आणि माझे भले करील माझ्याने होणारच नाही असा न्यूनगंड कोणीही मनात बाळगू नये.तुम्ही स्वतःच्या कर्तुत्वाने स्वतःची ओळख निर्माण करू शकता.स्वतःचे जीवन प्रकाशमान करू शकता. कोणीही कोणापेक्षा लहान-मोठा, श्रेष्ठ-कनिष्ठ नाही देव-धर्म,व्रत,नवस-सायास यात वेळ घालवण्यापेक्षा कर्तुत्व करण्यास शिका. कोणताही विचार, कृती , कार्य करण्यापूर्वी दहावेळा विचार करा डोळस व्हा.हे मी सांगतो म्हणून त्याला अंतिम समजू नका स्वतः अनुभव घ्या सत्य असते याची चिकित्सा करा मेहनत व मनगटावर विश्वास ठेवा तुम्ही असे वागलात तर नराचे नारायण व्हाल.
६.स्वावलंबी बना:-
माणसाने आपल्या जीवनात स्वावलंबी बनले पाहिजे." जो दुसऱ्यावर विसंबला,त्याचा कार्यभाग बुडाला' या उक्तीप्रमाणे व्यक्तीने दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वावलंबी बनावे याविषयी संत सेवालाल महाराज म्हणतात
*केरी भरोसेप मत बेसो ,पण दुसरेर भरोसेर बंनो ।
कोई केरी वाट चालेनी, सौतार वाट सौताच चालो ।*
तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर विसंबून राहू नका,परंतु दुसऱ्याच्या भरवशाच्या बना. कोणी कोणाची वाट चालत नाही म्हणजे सर्वकाही स्वतःलाच करावे लागते इतरांची वाट चालण्यापेक्षा स्वतःची नवीन वाट तयार करा असा दिव्य संदेश संत सेवालाल महाराज यांनी दिलेला आहे.
७.कपटनीतीचा त्याग करा:-
छल,कपट,बेईमानी करणार यावर फटकारे ओढताना संत सेवालाल महाराज म्हणतात
*जे कपट वाचा लेन आये ।
पाप ओरे सोबत जाये ।
यम घरेरो फासो ओरे गळेंम पडिये ।
नव मणेरी काया ओरी नरकेम मळजाये ।
लाख चौऱ्यांशी योनी भोगाये ।*
कपट नितिचा व्यवहार करून जे लोकांना फसवतील ते पापाचे भागीदार बनून नरकात जातील,चौऱ्याऐंशीलाख योनीत पापाचे भागीदार बनून भटकत राहतील.म्हणून कोणीही कपटनीतिचा व्यवहार करू नये असे ते सांगतात.
८.चोरी करू नका:-
समाजात मेहनती, नीतिवान व चारित्र्यसंपन्न लोकांची गरज असते चोरी करून पोट भरणाऱ्या विषय संत सेवालाल महाराज सांगतात
*करिये चोरी,खाये कोरी ।
घरे मुढांग एकच मोरी ।
हाते मांही आये हातकडी ।
पग लागीये बेडी ।
हिंडिय रे डोरी डोरी।*
चोर लुटारू माणसे समाजात असतील तर अशांतता पसरते,अराजकता माजते,लोकांना दुःख भोगावे लागते.पण चोरी करणारे पकडले गेले तर त्यांच्या हातात हातकड्या , पायात बेड्या पडतात पोलीस त्याला पकडून गल्लीबोळातून फिरवत नेतात .त्यांच्या मुलाबाळांचे हाल होतात.तेव्हा चोरी करण्यापेक्षा कष्टाची चटणी-भाकरी आवडीने खावी.चोरी केल्याने कोणीही सुखी होत नाही.
९.स्त्रियांचा आदर करा,त्यांना छळू नका:-
पूर्वीच्या काळी समाजात स्त्रियांचा फार छळ होत असे. मूलबाळ होत नसेल त्या स्त्रीला समाजात खूप छळ होत असे.म्हणून तीला हीन दर्जाची वागणूक दिली जात असेल तीचे तोंड पाहणेही अशुभ मानले जाई.श्री संत सेवालाल सांगताना म्हणतात
*वळाई हुई छोरी रो मामलो मत तोडजो ।
म्हणजे विवाहित मुलीची फारकत करू नका तिला सन्मानाची वागणूक द्या.
१०.निसर्गावर प्रेम करा:-
सेवालाल महाराज जिथे जिथे जात थांबत असे,तेथे वड,पिंपळ चिंच व कडुनिंबाचे झाड लावत त्याचे कारण सांगताना म्हणत वडाच्या झाडाची सावली दाट असते. पिंपळाच्या झाडाजवळ पाणी असते .कडुलिंबाचे झाडांमुळे हवेचे शुद्धीकरण होते.औषधी उपयोग होतो इतकेच नव्हे तर मृत्युनंतर आपली समाधी चिंचेच्या झाडाखाली बांधावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती
११. संत सेवालाल महाराज अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला करत असत. अंधश्रद्धेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर सेवालाल महाराज कार्य करत राहिले.विचार देत राहिले. समाजाला योग्य दिशा देऊन योग्य मार्गावर आणण्याचे कार्य महाराजांनी केले.संत सेवालाल महाराजांनी समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली. संत सेवालाल महाराज निरक्षर असूनही त्यांनी समाजाला बुद्धिप्रामाण्यवादाचे आणि विज्ञानाचे धडे दिले त्यांची वचने, दोहे साध्या सोप्या व सरळ अशा बंजारा बोलीभाषेत आहेत.संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी अमृततुल्य विचार केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला स्वावलंबी होण्याची ऊर्जा देणारे आहेत.समानतेची,स्वावलंबी होण्याची, कष्ट करण्याची, लबाडी न करण्याची आणि कुटपणे व्यवहार न करण्याचे चोरी व नशापाणी न करणे कर्मकांडात वेळ पैसा व शक्ती वाया न घालवता, देवी देवतांना बळी न देता प्रत्येक विचार कृती घटनेमागील सत्यता तपासून डोळस बनण्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे कार्य संत सेवालाल महाराजांनी केले. स्त्रियांना सन्मानाने वागविले पाहिजे म्हणून अनेक प्रयत्न केले निसर्गावर भरभरून प्रेम करण्याचे धडे संत सेवालाल महाराजांनी दिले.एवढेच नव्हे तर त्यांच्या जलविषयक दूरदृष्टीकोन दर्शवणारा एक उत्तम वचन म्हणजे...त्यांनी पाण्याविषयी केलेली भविष्यवाणी आज तंतोतंत लागू होते.ती अशी एक दिवस असा येईल रुपयाचे दहा दाणे चणे विकले जातील एक रुपयाला एक कटोरा पाणी मिळेल, बारा कोसावर एक दिवा दिसेल,बैलाच्या शिंग सोन्याचे होतील, माणसाला माणूस ओळखणार नाही...काळाच्या प्रवाहात सर्वांचा विचार करणारे सज्जन वागेल, पर्यावरणाचा विचार करेल तोच पुढे टिकून राहील,नाही तर तडफडल्या शिवाय पर्याय नसेल असे भविष्यवेधी वैज्ञानिक विचार संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिले.त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
लेखक - *श्री.सुभाष रामचंद्र राठोड 9011858485 / 9421922110*
rsubhash85@gmail.com
सदस्य,
अभ्यासमंडळ इतिहास व नागरिकशास्त्र समिती, महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती,पुणे
तथा
विषय सहायक
सामाजिकशास्त्र विभाग
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण),पुणे
तथा
राज्य समन्वयक
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे
Wednesday, 13 February 2019
Tuesday, 12 February 2019
Sunday, 10 February 2019
Friday, 8 February 2019
हार्ट अटयाक
कृपया 2 मिनिटे थांबा आणि हे वाचा:
1.संध्याकाळचे 7.25 वाजण्याची वेळ आणि आपण नोकरीवरुन कठोर परिश्रमानंतर सामान्यपणे घरी (अर्थातच) घरी परततआहात.
2. आपण खरोखर थकलेले, भागलेले आहात.
3 अाणी अशा वेळी अचानक आपल्याला आपल्या छातीत तीव्र वेदना जाणवु लागल्या ज्या आपल्या बाहूत आणि आपल्या जबड्यात जायला लागल्या असताना व आपण आपल्या घरा जवळच्या हॉस्पिटला पासुन फक्त पाच कि.मी दूर अंतरावर आहात.
4. दुर्दैवाने आपण ते अंतर पार करण्यास सक्षम अहात की नाही हे आपल्याला कळत नाही/ कल्पना नाही
5. सदर बाबतीत आपणास सीपीआरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे, परंतु ज्याने प्रशिक्षण दिले त्याने आपल्या स्वत: वर वेळ अाल्यावर त्याचा उपयोग कसा करावा हे सांगितले नाही/ शिकवले नाही.
6. एकट्याने हृदयविकाराचे रक्षण कसे करावे? बहुतेक लोक जेव्हा मदतीशिवाय हृदयाचा वेदना सहन करतात तेव्हा,म्हणजे ज्याचे हृदय अयोग्यरित्या धडधड त असल्याने बरे वाटत नाही तसेच चेतना हरवण्यापूर्वीची फक्त 10 सेकंद बाकी असतात.
7. अशा हृदय विकाराच्या व्यक्ती वारंवार आणि अत्यंत जोरदार खोकला काढुन स्वत: ला मदत करू शकतात. प्रत्येक खोकल्यापूर्वी एक गहन श्वास घ्यावा आणि खोकला खोल आणि लांब काढावा, परिणामी छातीच्या आत खोलवर स्त्राव तयार होतो. मदत येईपर्यंत प्रत्येक श्वासात श्वास आणि खोकल्याची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे जोपर्यंत हृदयाची धडधड पूर्ववत होत नाही तोपर्यंत असे करावे.
8. गहरी श्वास घेतल्याने फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन मिळतो आणि खोकल्याने हृदयाची हालचाल अाणी हृदयाचे रक्ताभिसरण होते व सामान्य लय पुन्हा मिळविण्यात मदत होते. अशा प्रकारे खोकला हृदयविकारा पासुन होणारी हानी कमी करण्यास मदत करतो
9. याबद्दल शक्य तितक्या इतर लोकांना हे समजावुन सांगा.
10. कार्डियोलॉजिस्ट सांगतात की ज्यांनी हा मेल प्राप्त केला आहे त्यां प्रत्येकाने हा मेसेज कमित कमी 10 लोकाना पाठवला तर आपण हे वचन देऊ शकता की आम्ही कमीत कमी एक आयुष्य वाचवू.
11. विनोद पाठविण्याऐवजी, कृपया या मेसेजला/संदेशाला अग्रेषित करुन योगदान द्या जे व्यक्तीचे जीवन वाचवू शकते.
12. जर हा संदेश तुम्हाला आला असेल तर ..किंवा. एकापेक्षा जास्त व्यक्ति कडुन आला तर.. कृपया त्रास वाटुन घेऊ नका ... त्याऐवजी आपण आनंदी असले पाहिजे, की तुमच्या ब-याच मित्रांना तुमची काळजी वाटते आणि म्हणुन त्यानी काळजी पोटी तो पाठविला अाहे.व ताे संदेश हृदयविकाराचा झटका आल्यास तो कसा हाताळावा ह्याची आपल्याला आठवण करून देत राहिल.
Wednesday, 6 February 2019
Monday, 4 February 2019
Sunday, 3 February 2019
Andhshrdhanirmulan
*शाळेत दाखवण्याजोग्या अंधश्रद्धा निर्मूलन करता येईल अशा शास्त्रीय पध्दती.*
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन विविध प्रात्यक्षिक प्रयोग विद्यालयात साजरा करून वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवा📿📿🔪⚗⚗🔭🔬🔭🔬🧲
_Please do verify before practice...🙏🏼🙏🏼_
*#काळीजादू*
_१_ *जादू कुंकू काळे करण्याची*
शिक्षीत लोकांनी आपल्या शिक्षणाचा व विज्ञानाचा उपयोग करून अंधश्रद्धेचे निर्मुलन केले पाहिजे अर्धा लहान चमचाभर कुंकूवात निरमा पावडर घ्या निरमा पावडरात अल्कली असते आणि कुकंवात अल्कली मिळताच काळे होते नेमके हिच कृती करून बुवालोक स्त्रियांना घाबरवून त्यांच्या मनात भीती निर्माण करतात.
_२_ *जादू हळदीचे कुंकू करण्याची*
बाबा लोक हळदीमध्ये थोडा प्रमाणात आधीच निरमा पावडर मिसळून ठेवतात निरमा पावडर अल्कली असते आणि अल्कली मुळे हळद लाल होते नेमके हिच कृती करून बाबालोक भोळ्या भाबड्या स्त्रियांना घाबरवून फसवितात.
_३_ *वस्तू गोड करणे*
सॅकरीन साखरेपेक्षा कित्येक पटीने गोड असते बाबा लोक ज्या ही वस्तूला हात लावतील ती वस्तू गोड होते तिर्थ गोड होते यासाठी बाबा लोकांनी सॅकरीनच्या गोळ्यांची पावडर आधीच हाताच्या बोटाला चोळली असते बिचारे भक्त यापासून अनभिज्ञ असतात आणि याच गोष्टीचा फायदा बाबा उचलतात.
_४_ *लिबांतून रक्त काढणे*
साहित्य--एक लिबूं चाकू मिथील ऑरेंज च द्रावण चाकुच्या पात्याला मिथील ऑरेंजच द्रावण लावावे थोड्या वेळाने त्या चाकुणे लिबूं कापल्यास लाल रक्ताप्रमाणे रस बाहेर येतो ही कृती तुम्ही कोणत्याही मंत्र न म्हणता करू दाखवू शकतात व लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करू शकता
_५_ *ताब्यांचे भांडे वर उचलणे*
ताब्यांचे लोटी घ्या.(भरणे) ते काठोकाठ तांदूळाणे भरूण घ्या त्यामध्ये एक साधारण मोठा पेचकस घेवून तो 4ते5 वेळा टोचा तांदूळाचे दाणे हवा निघून गेल्यावर एकदम फिट होतात तेव्हा पेचकस वर उचलूण घ्या ताब्यां वर उचलला जाईल.
_६_ *रसाने भरलेल्या लिंबूतून अग्नीच्या ज्वाळा निघणे.*
चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.
यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.
_७_ *पाण्याने दिवा कसा पेटू शकतो.*
एका दिव्यात पाणी घ्या. त्यात कॅल्शिअम कार्बाईडचे छोटे खडे टाका आणि पेटवा. दिवा आपोआप पेटेल. हे कसे झाले?
जेव्हा आपण पाण्यात कॅल्शिअम कार्बाईडचे खडे टाकतो तेव्हा त्यांची पाण्यावर अभिक्रिया होऊन 'अॅसिटिलीन' वायू तयार होतो जो ऑक्सीजनच्या सानिध्यात जळतो व पांढरी शुभ्र ज्योत तयार होते. आणि लोकांना वाटतं दिवा पाण्याने पेटला. तुम्हीसुद्धा करून पहा हे खडे तुम्हाला एखाद्या वेल्डरकडे सहज उपलब्ध होतील. मग कधी पेटवणार 'पाण्याने' दिवा..?
_८_ *आपोआप त्या मेणबत्त्या पेटणे.*
मित्रांनो चमत्कार सोपा आहे पण खूप काळजी घ्यावी लागेल.
तुम्हाला पिवळा फॉस्फरस व कार्बनडाय सल्फाईडचं द्रावण वापरायचं आहे. पिवळ्या फॉस्फरसचा ज्वलनांक केवळ ३४॰ से. असल्याने तो सामान्य तापमानातही लगेच पेट घेतो हे आपण दहावीत शिकलोय. तर या फॉस्फरसला कार्बनडाय सल्फाईडमध्ये विरघळवा. आणि तयार झालेल्या द्रावणात मेणबत्तीची वात भिजवा. कार्बनडाय सल्फाईड बाष्पनशील असल्याने तो हवेत उडून जातो व वातीवर फक्त पिवळा फॉस्फरस रहातो.. त्याच्या कणांना हवा लागली कि तो लगेच पेट घेतो पर्यायाने वातसुद्धा सहज पेट घेते आणि तुम्ही चमत्कारी बाबा ठरता.
_९_ *लिंबातून अक्षरश: ज्वाळा निघू लागणे.*
एक चाकू घ्या. चाकूच्या टोकास सोडीयम धातू घासून ठेवा. आता लिंबू डाव्या हातात घेऊन मुठीजवळील चाकूच्या पात्याने तो अर्ध्यापेक्षा जास्त कापा व चाकू अलगद बाहेर काढत फट बंद करा. लिंबावर दाब देत फट मोठी करताच अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील.
यात लिंबाच्या रसाचा सोडीयमशी संयोग होऊन हायड्रोजन मुक्त होतो. हायड्रोजन चटकन पेट घेतो व सोडीयम पिवळ्या रंगाने जळतो. म्हणून हि ज्योत आपल्याला चमकदार पिवळ्या रंगाची दिसते. फक्त लिंबू कापताना शरीरापासून दूर ठेवा.
_१०_ *अग्नीशिवाय यज्ञ पेटवणे.*
या चमत्कारात मांत्रिक बाबा यज्ञाची सर्व सामग्री यज्ञकुंडात टाकतो पण आपल्या नकळत त्यासोबत नारळाची बुरी आणि कागदाचे तुकडेही टाकतो. मंत्राचा जाप करत तो त्यावर यज्ञात टाकावयाची विभूती व गायीचे तुप सोडतो आणि काय चमत्कार यज्ञ आगपेटीशिवाय आपोआप पेटतो आणि आपण धन्य होऊन बाबाला शरण जातो.
पण मित्रांनो खरी गंमत इथेच आहे मंत्र म्हणताना बाबा जी विभूती त्या न पेटलेल्या यज्ञावर टाकतो ती Potassium Permanganate (KMno4) ची बारीक पावडर असते व ती दिसायला काळी असल्याने कुणाला संशयही येत नाही. आणि गायीचे शुद्ध तुप हे ग्लिसरीनचे काम करते. ज्यावेळेस बाबा हे तुप त्या बुक्कीवर सोडतो तेव्हा Potassium permanganate वर ग्लिसरीनची प्रक्रिया होऊन निळसर धूर निघतो आणि यज्ञ पेट घेतो. आहे कि नाही जादू!!
Saturday, 2 February 2019
Friday, 1 February 2019
Hunters Moon
🔹दोन सुर्यांचा ऊदय...
आज 30/01/19 रोजी... अमेरिका व कँनडाच्या सीमेवर पहाटे हे द्रुष्य पहायला मिळाले.
ज्यात खरं तर एक सुर्य आहे तर दुसरा चंद्र आहे.
सुर्य व चंद्रोदय एकाच वेळी होऊन सुर्यकिरण चंद्रावरून इतक्या प्रखरतेने परावर्तित होतात की चंद्र सुद्धा सुर्यासारखाच भासतो.ह्या प्रकारास "Hunters Moon" म्हणतात व जेंव्हा प्रुथ्वी आपला अक्ष बदलते तेंव्हाच असे द्रुष्य दिसते.
Subscribe to:
Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre